TheClearNews.Com
Tuesday, March 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कौटुंबिक स्नेहसंमेलनाने महावितरण कर्मचाऱ्यांना मिळाली नवी ऊर्जा

vijay waghmare by vijay waghmare
December 18, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

जळगाव प्रतिनिधी : महाlवितरणच्या जळगाव परिमंडल व मंडलातील कर्मचाऱ्यांचे ‘स्नेहबंध’ हे कौटुंबिक स्नेहसंमेलन बुधवारी (17 डिसेंबर) उत्साहात पार पडले. ग्राहकांना अविश्रांत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना या सोहळ्यामुळे नवी ऊर्जा मिळाली.
जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाबळ येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात हा सोहळा रंगला. प्रमुख अतिथी म्हणून अधीक्षक अभियंता विनोद पाटील, सहायक महाव्यवस्थापक महेश बुरंगे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर, कार्यकारी अभियंता मानसी सुखटनकर उपस्थित होते.
याप्रसंगी मुख्य अभियंता मुलाणी म्हणाले की, दैनंदिन कामाबरोबरच विविध क्षेत्रात महावितरणचे कर्मचारी उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. एकाच महिन्यात सर्वाधिक सौर कृषिपंप बसवण्याच्या महावितरणच्या कामाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नुकतीच नोंद झाली. या विक्रमात सर्व कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीत त्यांच्या कुटुंबियांचीही महत्त्वाची भूमिका आहे. अनेक वेळा रात्री-अपरात्री खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर हजर व्हावे लागते. मात्र कसलीही तक्रार न करता कुटुंबीय त्यांना सांभाळून घेतात. त्यामुळे कामातून विरंगुळा मिळण्यासाठी हा कार्यक्रम आहे. कर्मचाऱ्यांचे पाल्यही विविध क्षेत्रात चमकत आहेत, हे कौतुकास्पद आहे. यापुढेही कर्मचारी महावितरणचा नावलौकिक उंचावतील, अशी अपेक्षा मुलाणी यांनी व्यक्त केली.
या सोहळ्यात कर्मचाऱ्यांनी विविध गुणदर्शन सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. योगेश गांगुर्डे, ज्योती दुसाने, सुरेश गुरचळ, विशाल आंधळे, योगेश जैस्वाल व अंकिता पांडे यांनी सुमधुर गाणी गायली. महेंद्र महाजन यांनी काव्य वाचन केले. कुडाळ (जि.सिंधुदुर्ग) येथील साई कला मंचाने मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारा ‘रंगी रंगला महाराष्ट्र’ हा गीतसंगीतनृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर केला.
प्रास्ताविक उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर यांनी केले. सूत्रसंचालन कनिष्ठ अभियंता रत्ना पाटील यांनी केले. जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड यांनी आभार मानले. कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी, चेतन नंदनवार, शिवाजी चव्हाण, गणेश महाजन, सखाराम थान्वी, प्रणाली विश्लेषक मनोज भराडे, वरिष्ठ व्यवस्थापक अमित सोनवणे, गणेश लिधुरे, व्यवस्थापक तन्वी मोरे यांच्यासह विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी, परिमंडलातील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद घेतला.
महावितरणच्या कौटुंबिक स्नेहसंमेलनात मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी यांचे स्वागत करताना अधीक्षक अभियंता विनोद पाटील. यावेळी सहायक महाव्यवस्थापक महेश बुरंगे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर, कार्यकारी अभियंता मानसी सुखटनकर.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

March 3, 2026
गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 03 मार्च 2026 !

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 02 मार्च 2026 !

March 2, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 19 डिसेंबर 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वंचित, दुर्लक्ष‍ित घटकांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद !

December 15, 2023

भाजपच्या अल्पसंख्याक युवा मोर्चा महानगर जिल्हाअध्यक्षपदी अश्फाक शेख यांची नियुक्ती

November 17, 2021

जळगावात ‘आत्मोत्कर्ष चातुर्मास’चा मंगल प्रवेश उत्साहात

July 4, 2025

दीर-भावजयची एकमेकांना मिठी मारत विष प्राशन करून आत्महत्या ; ८ दिवसांपासून होते बेपत्ता !

February 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group