साकळी ता. यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील हिंगोणा/ सांगवी परिसरातील शंतनू पेट्रोलियम ( भारत पेट्रोलियम) यांच्या वतीने शेतकरी मेळावा आज दि. २५ रोजी आयोजित केला होता.
शेतकरी वर्गाची चांगली उपस्थिती लाभल्याने हा मेळाव्याला चांगले सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी आ.रमेश चौधरी हे होते. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक मा.पाल डेन भुतिया (सेल्स ऑफीसर भारत पेट्रोलिम) होते. त्याच प्रमाणे शेतकरी मेळाव्याचे प्रमुख वक्ते डॉ.के.बी. पाटील ( केळी तज्ञ) जैन ईंरिगेशन जळगाव हे होते. तसेच कार्यक्रमाला केळी तज्ञ डॉ. के.बी. पाटील यांनी शेतकरी बांधवांना केळी विषय मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांचे मुळे उपस्थित शेतकरी बांधवांना बरेच काही शिकायला मिळाले. तसेच प्रमुख पाहुण्यांचे शनंतु पेट्रोलियमचे मालक शंशाक देशपांडे यांनी शाल व पुष्पहार देऊन स्वागत केले. यावेळी परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.