मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यातील वाद चांगलाच चिघळत आहे. “माझे शब्द अधोरेखित करा. मी पुन्हा सांगतो ‘बाप बेटे जेल जाऐंगे’ यांच्या व्यतिरिक्त ३ सेंट्रल एजन्सी अधिकारी आणि त्यांचे वसुली एजंट देखील तुरुंगात जातील. महाराष्ट्र झुकेगा नाही!”, असे ट्वीट करत संजय राऊतांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे.
आपल्या ट्विटमध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं, “माझे शब्द अधोरेखित करा…. मी पुन्हा सांगतो ‘बाप बेटे जेल जाऐंगे’ आणि बाप-बेटा यांच्या व्यतिरिक्त तीन केंद्रीय तपास यंत्रणेंचे अधिकारी आणि त्यांचे वसुली एजंट देखील तुरुंगात जातील”.
इतकेच नाही तर संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये शेवटची ओळ ही पुष्पा सिनेमातील डायलॉगचा संदर्भ घेत लिहिली आहे. “महाराष्ट्र झुकेगा नहीं” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
“बाप बेटे जेलमध्ये जाणार, Wait and watch, कोठडीचं Sanitization सुरू”
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी १५ फेब्रुवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. भाजप नेते किरीट सोमय्या, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते मोहित कंबोज हे संजय राऊत यांच्या निशाण्यावर होते. त्यानंतर 16 फेब्रुवारीला संजय राऊत यांनी एक ट्विट करत म्हटलं, “बाप बेटे जेल मधे जाणार! Wait and watch! कोठडीचे sanitization सुरू आहे.. जय महाराष्ट्र!”.