मुंबई (वृत्तसंस्था) ‘भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले,’ असं वादग्रस्त वक्तव्य बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतनं केलंय. कंगनाच्या या वक्तव्यानंतर तात्काळ पद्मश्री परत घ्या, तिच्यावर स्वातंत्र्यवीरांचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
नवाब मलिकांवर ईडीने छापे मारले अशा अफवा पसरवण्यात आल्या. मात्र मला ईडीच्या लोकांना सांगायचं आहे, अफवा पसरवणं बंद करा, प्रेस घ्या किंवा नोट काढून लोकांना खरी माहिती सांगा, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. शुक्रवारी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत आपल्यावरील आरोपाचं खंडण केलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, अफवांचा खेळ खेळू नका, काल पुण्यात ज्या कारवाया सुरु आहेत, त्या खोट्या आहेत. वक्फ बोर्ड जमिनीवरील कारवाईवरुन अफवा सुरु आहे. जमिनी ज्यांनी हडप केल्या आहेत, त्यांचं क्लीनअप मशीन आम्ही हाती घेतलं आहे. भाजपच्या माजी मंत्र्याने जमिनी लाटल्या. या क्लीनअप मशीनला ईडी सहकार्य करेल अशी आशा आहे. मालकाला खूश करण्याचा ईडीच्या अधिकाऱ्यांचा प्रयत्न, नवाब मलिक कोणाला घाबरणार नाही, जो जो ललकारेल, त्याला करारा जबाब मिळेल, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.
कंगना रनौत म्हणते १९४७ मध्ये स्वातंत्र्य नव्हे भीक मिळालं, २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळालं, या त्यांच्या वाक्याचा निषेध करतो. गांधींपासून अनेक स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचा अपमान आहे. कंगनाचा पद्म पुरस्कार पुरस्कार घ्या, कंगनाचं वक्तव्य स्वातंत्र्यवीरांचा अपमान आहे. तात्काळ पद्मश्री परत घ्या, तिच्यावर स्वातंत्र्यवीरांचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, असं नवाब मलिक म्हणाले.