धानोरा ता.चोपडा, (प्रतिनिधी) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी निवडणूक पूर्वी राज्यातील वीज ग्राहकांना ३०० युनिट वीज वापर केल्यास ३० टक्के स्वस्त दरात वीज पुरवठा करण्याचे वचन जाहीरनाम्यात दिले होते. याबाबत महाराष्ट्रातील तमाम जनतेची दिशाभूल व फसवणुक करण्यात येत आहे. यासंदर्भात चोपडा येथील आम आदमी पार्टीतर्फे सरकारविरुद्धात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
त्यामुळे त्यांच्यावर पूर्ण महाराष्ट्रात आम आदमी पार्टी तर्फ़े ठिकठिकाणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आले आहे. देशात व राज्यात कोरोना महामारीचे भयंकर संकट उभे असतांना दि. १ एप्रिल २०२० पासून जवळपास वीस टक्के वीजदर वाढ करून रुपये तीन प्रती युनिट तयार होणारी वीज रु. १५ वसूल करण्यात येत आहे. एकूणच राज्यातील जनतेसोबत फार मोठा धोका केला आहे. हे सर्व सामान्य माणसाचे घेऊन आम आदमी पार्टी व उभ्या महाराष्ट्रातील जनता सरकार दरबारी वारंवार विनंती करत आहे,याच पद्धतीने एखाद्या खाजगी व्यवसाईक कंपनीने राज्यातील वीज ग्राहकांनी फसवणुक केली असती तर त्या संबंदित कंपनी वर IPC 420 नुसार फोजदारी गुन्हा दाखल करण्यात आले असते. अश्या प्रकारे अमिश दाखवून महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल व फसवणूक केली आहे.
यावेळी चोपडा येथे आम आदमी पार्टीचे जिल्हा सचिव रईस खान, विठ्ठलराव साळुंखे जिल्हा सह संयोजक, राजमल पाटील , गोकुळ पाटील, कांऱ्या पावरा, जतन पावरा, कलरसिंग बारेला यांनी चोपडा शहर पोलिस निरीक्षक संजय ठेंगेसाहेब यांचा कडे अश्या प्रकारे गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे केली आहे.