अमळनेर(प्रतिनिधी) प्रभाग क्रमांक १५ मधील श्रीराम कॉलनी येथे मागील दहा वर्षापासून भर रस्त्यावर इलेक्ट्रिक पोल टाकलेला होता. हा पोल रहदारीला मोठा अडथळा ठरत होता. रात्री-अपरात्री या इलेक्ट्रिक पोलला नागरिक ठोकले गेल्यामुळे अपघात देखील घडत होते. म्हणून तात्काळ पोल हटविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती.
या बद्दल येथील रहिवाशी राजू ठाकुर, प्रल्हाद पाटील, छोटू पाटील, शेटे काका, सुधाकर महाजन, रमेश पाटील यांनी सदर इलेक्ट्रिक पोलची समस्या सांगितल्यावर माजी शिवसेना शहर प्रमुख व नगरसेवक प्रताप शिंपी यांनी रस्त्यावरच्या पोल संबंधित यंत्रणेच्या साहाय्याने बाजूला करून नवीन पोल टाकून घेतला. भरपूर वर्षे रखडलेले काम प्रताप शिंपी यांनी पटकन केल्याने परिसरात कौतुक होत आहे.