जळगाव (प्रतिनिधी) मेशो (Meshoo) येथून कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह बोलत असल्याचे भासवून कासोदा येथील दुकानदाराची १ लाख ३७ हजार ५०० रुपयात ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस स्थानकात मेशो ॲपच्या बनावट कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात सैय्यद हरशद अली अख्तर (वय ३०, रा. गौसिया नगर, मदिना मस्जिद जवळ कासोदा ता. एरंडोल) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ११ मे २०२२ रोजी meshoo या ऑनलाईन खरेदी ॲपच्या बनावट कस्टमर केअरच्या मोबाईल क्रमांक ७६५३८९५२१९ यावरून सैय्यद अरशद यांच्या मोबाईलवर फोन करून meshoo येथून कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह बोलत असल्याचे भासवून Anydesk नावाचे ऍप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगून त्याद्वारे सैय्यद अरशद यांच्या एचडीएफसी बँक खात्यातून वेळोवेळी ऑनलाईन नेट बँकिंगद्वारे १ लाख ३७ हजार ५०० रुपये बडवून आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस स्थानकात meshoo कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनि लीलाधर कानडे हे करीत आहेत.