जळगाव (प्रतिनिधी) भाजपने जळगाव लोकसभा मतदार संघातील आपला उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू केल्याची चर्चा होती. मात्र, मंत्री गिरीश महाजन यांनी यासंबंधीचे वृत्त साफ फेटाळून लावले आहे. याबाबतचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने दिले आहे. दरम्यान, माजी खासदार ए. टी. पाटील हे पुन्हा दिल्लीत तळ ठोकून असल्याचे वृत्त समोर आल्यामुळे उमेदवार बदल्याच्या चर्चेला उधाण आले होते.
ए. टी. पाटील यांनी दिल्लीत भाजपश्रेष्ठींची भेट घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे भाजप पुन्हा एकदा उमेदवारी बदलणार का?, याची चर्चा सुरु झाली होती. परंतू आता मंत्री गिरीश महाजन यांनी यासंबंधीचे वृत्त साफ फेटाळून लावले आहे. त्यामुळे ए. टी. पाटील यांच्या नावाची नुसतीच चर्चा असल्याचे समजते. भाजपने विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे तिकीट कापत स्मिताताई वाघ यांना उमेदवारी दिली. यामुळे उन्मेश पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. एवढेच नव्हे तर त्यांचे विश्वासू मित्र करण पवार यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देखील मिळवून दिली. यानंतरच उमेदवार बदल्याच्या चर्चा सुरु झाली होती. परंतू ए. टी. पाटील यांनी दिल्लीत भाजप नेत्यांची भेट घेतली, यामुळे भाजप उमेदवार बलणार. मात्र, ही केवळ चर्चा असल्याचे समोर आले आहे.