चोपडा (प्रतिनिधी) खानदेश बहुउद्देशीय संस्था संचलित नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी जळगाव येथे दी ७ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेत चोपडा येथील श्रीमती शरद चंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांनी घवघवित यश मिळविले.
श्रीमती शरद चंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालयातून ३५ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्यातील हापसा हनीफ मोमीन, हर्षदा भोजराज पाटील, शुभम प्रमोद पाटील, चेतन भावलाल बारी व गिरीश कपिल सोनवणे या विद्यार्थ्यांनी विद्युत विभागातील राज्यस्तरीय पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला त्यांना कमलेश पाटील, विद्युत विभागप्रमुख व शशिकांत पाटील व्याखते विद्युत विभाग यांचे उत्तम मार्गदर्शन मिळाले तसेच मनोज ललित चौधरी व साहिल प्रशांत पाटील यांनी यांत्रिकी विभागातून दुसरा क्रमांक मिळवला त्यांना एन.आर. पाटील यांत्रिकी विभाग प्रमुख यांचे मौल्यवान मार्गदर्शन मिळाले.
स्थापत्य विभागातून निकिता वसंत कोळी व विधी सत्यजित पाटील यांचा राज्यस्तरीय पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेत पहिला क्रमांक मिळविला त्यांना श्री. एन आर शिंदे स्थापत्य, विभागप्रमुख यांचे मौल्यवान मार्गदर्शन मिळाले. सदरील विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय भैय्यासाहेब अँड. संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्ष माननीय ताईसाहेब आशाताई विजय पाटील तसेच डॉ. स्मिताताई संदीप पाटील व तंत्रनिकेतनाचे प्राचार्य व्ही.एन. बोरसे यांनी विशेष कौतुक करीत विद्यार्थ्यांना शाबासकी दिली व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.