TheClearNews.Com
Tuesday, February 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

जळगाव जिल्हा '१०० टक्के निवारा' असलेला राज्यातील पहिला जिल्हा करण्याचा संकल्प – पालकमंत्री गुलाबराव पाटील

vijay waghmare by vijay waghmare
May 1, 2025
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात अवास योजनेअंतर्गत १ लाख ९ हजार ९७७ घरकुले पूर्ण झाली असून १ लाख २२ हजार ९७१ घरकुले प्रगतीपथावर आहेत. २५,१३२ लाभार्थ्यांना शासकीय जागा वितरित करण्यात आली आहेत. जळगाव जिल्ह्यात एकही परिवार पक्या घरापासून वंचित राहणार नाही असा राज्यातला पहिला जिल्हा करण्याचा संकल्प आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर जिल्ह्यातील जनतेला उद्देशून त्यांनी संदेश दिला. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह विविध प्रशासनिक अधिकारी, जनप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

READ ALSO

महिलेचा विनयभंग ; मुलास जिवे ठार मारण्याची धमकी

क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “खानदेश ऑर्गन ट्रान्सप्लांट गेम्स” उत्साहात संपन्न

सुरुवातीलाच पालकमंत्र्यांनी पहलगाम अतिरेकी हल्यात बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त केल्या. जिल्ह्याच्या प्रगतीचा आढावा घेताना सलग तीन वर्षे जिल्हा वार्षिक योजनेतील शंभर टक्के निधी खर्च करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जळगावचा समावेश असून, यंदा ७० कोटींचा वाढीव निधी मंजूर झाल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

‘सर्वांना निवारा’ संकल्प
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १.०९ लाख घरकुले पूर्ण झाली असून, १.२२ लाख घरकुले प्रगतिपथावर आहेत. २५,१३२ लाभार्थ्यांना शासकीय जागा वितरित करण्यात आली आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी सर्व घरकुले पूर्ण करून जळगाव जिल्हा १०० टक्के निवारा असलेला राज्यातील पहिला जिल्हा करण्याचा संकल्प पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

महिलांचा आर्थिक सशक्तीकरणासाठी टप्पा
जिल्ह्यात ३०,००० महिला बचतगटांमधून ३ लाख महिला कार्यरत असून त्यांना ४१० कोटी रुपये कर्जवाटप झाले आहे. यातील १.०७ लाख महिला ‘लखपती दीदी’ झाल्या असून, यावर्षी १ लाख महिलांना लखपती बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच ११ ठिकाणी बहिणाबाई मार्ट उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

पाणीपुरवठा व सिंचन प्रगतीपथावर
जलजीवन योजनेमुळे जिल्ह्यातील अनेक गावं टँकरमुक्त झाली आहेत. गेल्या वर्षी १ मे पर्यंत उन्हाळ्यात ८३ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत होता; आता १ मे रोजी
ही संख्या केवळ ८ गावांवर आली आहे. संपूर्ण जिल्हा टँकरमुक्त करण्याच्या दिशेने काम सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शेळगाव बॅरेजचे काम मार्च २०२५ मध्ये पूर्ण झाले असून, १११५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. यंदा ३७ दलघमी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले असून त्यामुळे २५ गावांना थेट फायदा झाला आहे आणि १२ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

ऊर्जा आणि वाहतूक क्षेत्रात झपाट्याने वाटचाल*
दीपनगर येथे ६६० मेगावॅट क्षमतेचा नवीन ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला असून, मुख्यमंत्री सौर वाहिनीअंतर्गत ३२८ मेगावॅट अतिरिक्त वीज मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा १२ तास अखंड वीजपुरवठा शक्य होईल अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
जळगाव शहरालगतचा राष्ट्रीय महामार्ग वळण रस्ता प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. पावसाळ्यापूर्वी वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

समग्र विकासाकडे वाटचाल
हवाई सेवा, क्रीडा, वैद्यकीय सुविधा, जलजीवन, सिंचन प्रकल्प, वळण रस्ता आदी क्षेत्रांचा आढावा घेत, जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. “जिल्ह्याचा प्रवास सतत उत्कर्षाकडे राहील,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonGuardian Minister Gulabrao Patil hoists the flag on the occasion of Maharashtra Foundation Day

Related Posts

गुन्हे

महिलेचा विनयभंग ; मुलास जिवे ठार मारण्याची धमकी

February 23, 2026
जळगाव

क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “खानदेश ऑर्गन ट्रान्सप्लांट गेम्स” उत्साहात संपन्न

February 22, 2026
जळगाव

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

February 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

February 21, 2026
एरंडोल

तळई नगरीत व्याख्यानातून शिवविचारांचा जागर

February 21, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
Next Post

तंत्रज्ञानाला परिश्रमाची जोड द्या - अशोक जैन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव पंचायत समितीचे आरक्षण सोडत जाहीर !

July 28, 2022

अनुभूती निवासी शाळेतर्फे पंडीत जसराज यांना श्रद्धांजली

September 7, 2020

गोळीबाराच्या थराराने जळगाव पुन्हा हादरले ; घरात घुसून तरुणावर चार ते पाच राऊंड फायर !

September 23, 2021

महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर

August 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group