धरणगाव (प्रतिनिधी) कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर जळगाव जिल्ह्यात ना. गुलाबराव पाटील उद्या (शनिवार) मोठ्या जल्लोषात स्वागत केले जाणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो वाहनांचा ताफा आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. नवलनगर ते पाळधी अशी तब्बल ६० कि.मी. भव्य रॅली निघणार आहे.
अवघ्या दोन वर्षांत पुन्हा नव्या सरकारमध्ये गुलाबराव पाटील दुसऱ्यांदा कॅबिनेट झाले आहे. यापूर्वी ठाकरे सरकारमध्ये असताना ते कॅबिनेट मंत्री होते. जळगाव जिल्ह्याला आता भाजपकडून गिरीश महाजन तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील यांच्या रुपाने दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत. आज सकाळी गिरीश महाजन यांचे रेल्वे स्थानकावर मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. तर उद्या (शनिवार) मोठ्या जल्लोषात स्वागत केले जाणार आहे. तबब्ल ६० कि.मी. भव्य स्वागत रॅली निघणार आहे. यानिमित्ताने पानटपरी चालक ते फायरब्रँड, कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांची लोकप्रियता अबाधित असल्याचे दिसून येत आहे. ना. पाटील हे नाशिकहून धुळे-नवलनगर मार्गे जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते नवलनगर जवळ थांबणार आहेत. यावेळी जळगाव जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते आपल्या शेकडो वाहनांनी तेथे पोहोचणार आहेत. यानंतर अमळनेर आणि धरणगावलाही मोठ्या धूमधडाक्यात ना. पाटील यांचे स्वागत केले जाणार आहे. धरणगावात पोहचल्यावर शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर रॅली पाळधीच्या दिशेने रवाना होणार असून तेथेच रॅलीचा समारोप होणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील सर आणि राजेंद्र महाजन हे दौऱ्याचे नियोजन करत आहेत. दरम्यान, ऐतिहासिक ६० कि.मी.च्या रॅलीबाबत सोशल मीडियात आतापासून याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
अशी आहे, गुलाबराव पाटील यांची राजकीय कारकीर्द
1999 – विधानसभेवर पहिल्यांदा निवडून गेले
2004 – विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा विजयी
2009 – विधानसभेला पराभव, शिवसेना उपनेतेपदी निवड
2014 – विधानसभा निवडणुकीत विजयी
2016-2019 – फडणवीसांच्या मंत्रिमंडळात सहकार राज्यमंत्री म्हणून कामकाज
2019 – विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा विजय
जानेवारी 2020 – ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी
















