मुंबई (वृत्तसंस्था) ‘संजय राऊत इतके मोठे नेते नाही की मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर द्यावे. केंद्रीय सचिवांकडे जो अहवाल दिला आहे, तो लवंगी फटका आहे की बॉम्ब आहे हे लवकरच समोर येईल.’, अशा शब्दांत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘आपल्याला कल्पना आहे की ज्या घटना सध्या बाहेर येत आहे ते चिंताजनक आहे. त्याही पेक्षा खेदजनक आहे की मुख्यमंत्री काहीच बोलत नाही. शरद पवार बोलले पण त्यांनी प्रकरणाचा बचाव केला. काँग्रेसची भूमिका वेगळीच आहे. केवळ सत्तेसाठी सगळं चालले आहे. माझा काँग्रेसला सवाल आहे की त्यांना किती वाट हिस्सा मिळतो ते सांगावे’, असा सवाल फडणवीस यांनी काँग्रेसला विचारला. ‘हे मनमानी करणार सरकार आहे. कोरोनाकडे तर यांचं लक्षच नाही. मला कळत नाही की महाराष्ट्रातच का कोरोना का वाढतोय. मुनगंटीवार यांनी १०० गोष्टी दाखवून दिल्या आहेत. जेव्हा सरकारने सवैधानिक कर्तव्य बजावले नाही. हा अहवाल बाहेर आल्यानंतर कोणाचे चेहरे पुढे येतील या भीतीने तुम्ही लपवून ठेवलं. ते कोण लोक आहेत, ज्यांच्या वर या माध्यमातून पुढे येणार आहेत. म्हणून तुम्ही लपवून ठेवले’, असा आरोपही फडणवीसांनी केली.
‘संजय राऊत इतके मोठे नेते नाही की मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर द्यावे. केंद्रीय सचिवांकडे जो अहवाल दिला आहे, तो लवंगी फटका आहे की बॉम्ब आहे हे लवकरच कळेल’, असा टोला फडणवीसांनी लगावला.
















