चोपडा (प्रतिनिधी) रोटरॅक्ट क्लब ऑफ चोपडा व आरोग्य वर्धिनी केंद्र, निमगव्हाण (चोपडा) यांच्यावतीने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या विशेष सहकार्यातून तांदलवाडी येथील जय श्री दादाजी हायस्कूल येथे ‘किशोरवयीन मुलींचे ॲनिमिया, रक्तगट व आरोग्य तपासणी तथा उपचार शिबिर’ नुकतेच संपन्न झाले.
शिबीरांतर्गत विद्यालयातील इयत्ता ७ वी ते १० वी च्या वर्गातील ५० मुलींची तपासणी करण्यात आली. समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.विश्वास पाटील यांनी मुलींची आरोग्य तपासणी केली तर आरोग्य सेवक उज्वल घागरे, गट प्रवर्तक संगिता बाविस्कर, आशा स्वयंसेविका ललिता कोळी, लॅब टेक्निशियन शितल माळी यांनी रक्ताचे नमुने घेऊन ५० किशोरवयीन मुलींचे हिमोग्लोबीन व रक्तगट तपासणी केले तसेच ज्या मुलींना औषधोपचार आवश्यक होते आदींना विनामूल्य औषधींचे वाटप देखील करण्यात आले.
श्री.धुनिवाले दादाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनराज पोपट पाटील, निमगव्हाणचे माजी उपसरपंच देवानंद पाटील, तांदलवाडीचे पोलीस पाटील गणेश धनगर, सामाजिक कार्यकर्ते विनोद धनगर, मुख्याध्यापक व्ही.पी चौधरी आदी मान्यवरांच्या प्रमूख उपस्थितीत शिबिरास प्रारंभ झाला.
सदरील शिबिर आरोग्यदूत जितेंद्र गवळी (जळगाव) व पितांबर भावसार (जामनेर) यांच्या मार्गदर्शनातून संपन्न झाले. शिबीराअंती शिबीरात सहभागी डाॅक्टर, नर्स, आरोग्य सेवक व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह रोटरॅक्ट क्लबच्या पदाधिकाऱ्यांचा जय श्री दादाजी हायस्कूलच्या वतीने मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी कृतज्ञतापूर्वक सत्कार करून सर्वांचे आभार मानले.
शिबीर यशस्वीतेसाठी रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अनिल बाविस्कर, सचिव गौरव जैन, माजी अध्यक्ष प्रा.दिव्यांक सावंत, खजिनदार मयुरेश जैन, प्रकल्प समन्वयक श्री.केदार शर्मा, निमगव्हाण माजी उपसरपंच देवानंद पाटील, मुख्याध्यापक व्ही.पी चौधरी, शिक्षकवृंद ए.एल.चव्हाण, के.एन.पाटील, एस.पी.साळुंखे, श्रीमती.आय.एल.पाटील,एन.पी.पाटील, संदीप लांडगे, कर्मचारी गोपाल पाटील यांनी परिश्रम घेतले.