मेष : नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल. व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर वेळ काढावा लागेल. काहींना नकारात्मक अनुभव येतील. मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागणार आहे. मन शांत व संयमी ठेवावे. व्यवसायासाठी काही रणनीती बनवाल, ज्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणे टाळावे. काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. मन:स्वाथ्य कायम ठेवून कार्य करावे. आततायीपणे वागून चालणार नाही.
वृषभ : कुटुंबातील सर्व सदस्य उत्साहाने सहभागी होतील. जे पाहून तुम्हाला आनंद होईल. मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. वाहन चालवताना तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. एखाद्या खास मित्राची भेट होऊ शकते. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. खोळंबलेली कामे मार्गी लागतील. मित्रांकडून अनपेक्षित टोला बसू शकतो. चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका.
मिथुन : प्रगतीचा हा वेग कायम ठेवण्यासाठी तुम्हाला व्यवसायासाठी प्राधान्य द्यावे लागेल. प्रवास टाळावेत. अनावश्यक गोष्टीत आपला अमूल्य वेळ वाया घालवू नये. मानसिक अस्वस्थता असली तरी शांत राहावे. अनावश्यक अभिमानाला बळी पडू नका. आपल्या कृतींवर लक्ष केंद्रित करा. काहींचा आध्यात्मिक व धार्मिक गोष्टीत सहभाग राहील. स्वत:च्या विचारांना स्थिर ठेवा. जोडीदाराचा सल्ला ऐकावा. जुन्या मित्रांशी भेटीचा अथवा फोनवरून संपर्क होण्याची शक्यता.
कर्क : वडिलांच्या सल्ल्याने तुमची या समस्येतून सुटका होईल. कुटुंबासोबत प्रवासाला जाण्याचा प्लान कराल. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत राहाल. मौज करणार आहात. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. मनावरील ओझे हलके होईल. मित्रांसोबत काही वाद असतील ते वाढवू नका. प्रवास होतील. घरातील जबाबदारी पेलताना दमणूक होईल. आहारात पथ्ये पाळावीत. काही गोष्टींची गुप्तता पाळाल.
सिंह : व्यवसायाकडे नियमितपणे लक्ष द्या. आज व्यवसायात तुम्हाला जवळच्या व्यक्तीची मदत होईल. मानसिक प्रसन्नता लाभेल. मन आनंदी व आशावादी असल्याने अनेक कामे होणार आहेत. आरोग्य उत्तम राहील. प्रलंबित कामे पूर्ण होतील. कुटुंबात काही वाद निर्माण होऊ शकतात. वाद संयमाने सोडवावा लागेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव वाढणार आहे. नवीन कार्याला चालना मिळेल. तुमच्या शब्दाला मान लाभेल. बौद्धिक चुणूक दाखवाल. आपल्याच मतावर ठाम राहाल.
कन्या : भविष्यात तुम्हाला फायदा होईल. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी यशस्वी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. जिद्द वाढणार आहे. चिकटीने प्रयत्न करत राहणार आहात. मनोबल उत्तम राहील. सासरच्या लोकांकडून विशेष सन्मान मिळेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातही तुमची प्रतिष्ठा वाढेल. प्रवास सुखकर होणार आहेत. घरातील बरीच कामे मार्गी लागतील. जोडीदाराशी सामंजस्याने वागावे. मनातील निराशा दूर करावी.
तुळ : सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात तुमचे विरोधक प्रबळ होतील. आशावादीपणाने कार्यरत राहाल. आर्थिक कमाई होईल. मनोबल उत्तम राहील. कौटुंबिक सुसंवाद राहील. तुमच्या धैर्याने आणि बुद्धिमत्तेने त्यांचा पराभव करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या मनातील दुर्बलतेचे विकार सोडून द्यावे लागतील. एकूणच आजचा दिवस आनंदी असणार आहे. हातून चांगले काम होईल. घरामध्ये शांत राहावे. महत्त्वाचे निर्णय गांभीर्याने घ्यावेत. आपल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या.
वृश्चिक : कामानिमित्त प्रवास करा. जुन्या वादातून तुम्हाला मुक्तता मिळेल. निराशाजनक विचार मनात येऊ नका. उमेद वाढेल. कामाचा उरक राहील. अनेक कामे मार्गी लावणार आहात. तुमचा प्रभाव राहील. सर्वत्र आनंदीपणाने वावर राहील. आज नोकरीत अधिकारी वर्गाकडून प्रमोशन मिळण्याची पूर्ण आशा आहे. चिंता कमी होतील. कमिशनच्या कामातून चांगली कमाई कराल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल.
धनु : व्यवसायात अपयश मिळेल. रखडलेली पैसे मिळतील. जोडीदाराची सल्ला व्यवसायात उपयुक्त ठरेल. मानसिक अस्वस्थता राहील. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. मुलांच्या भविष्याची चिंता संपेल. वडिलांची तब्येत बिघडू शकते. मित्रांचा सल्ला फायदेशीर ठरेल. धार्मिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल. दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत. हातून चांगली कामे होतील. गरज नसेल तर खर्च टाळा. खाण्यावर नियंत्रण ठेवा. आत्मविश्वास वाढीस लागेल.
मकर : तुम्हाला कौटुंबिक सदस्याकडून काही चांगली बातमी मिळेल. आईकडून पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. काहींना विविध लाभ होणार आहेत. नवीन परिचय होतील व त्याचा फायदा होईल. काहींना शेअर्सच्या माध्यमात फायदा होईल. आर्थिक लाभ होतील. जीवनसाथीसोबत दैनंदिन गरजेची वस्तू खरेदी कराल. विद्यार्थी परीक्षत तुम्हाला यश मिळेल. मन आनंदी राहील. अति विचार करू नका. धार्मिक गोष्टीत मन रमवावे. कौटुंबिक गोष्टी सबुरीने घ्याव्यात. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
कुंभ : अध्यात्माची आवड वाढेल. गुंतवणूक करण्यासाठी दिवस चांगला असेल. वाहन चालवताना काळजी घ्या. आज तुमची वाटचाल सकारात्मक असणार आहे. चिंता, दुःख विसरुन कामाला लागा. मनोबल उत्तम राहील. आजचा दिवस संमिश्र परिणाम देईल. परदेशातून व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज काही चांगली बातमी मिळेल. प्रवास सुखकर होतील. मुलांबरोबर खेळ खेळावेत. प्रेमसंबंध अधिक दृढ करावेत. ध्येयाकडे लक्ष केन्द्रित करावे. भावंडांशी संवाद साधावा.
मीन : तुमचे नुकसान करण्याा प्रयत्न करतील. उधार दिलेले पैसे मिळतील. आई-वडिलांची सेवा करण्याची संधी मिळेल. जिद्दीने कार्यरत राहाल. कामे मार्गी लागतील. प्रवासाचे अनपेक्षितपणे योग येतील. नातेवाईक भेटतील. आनंदी राहावे. आज तुम्हाला नोकरी व्यवसायात गुप्त शत्रूंपासून सावध राहावे लागेल. मनोबल उत्तम राहणार आहे. घरातील वातावरण शांततामय ठेवा. अधिकार बेताचाच वापरा. बोलताना तोल जाणार नाही याची काळजी घ्या.