जळगाव (प्रतिनिधी) भगवान महावीर जयंतीनिमित्त जळगाव शहरात आयोजित शासनपती श्रमण भगवान स्वामीजी यांच्या २६२३ व्या जन्मकल्याण महोत्सवाला महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी समाज बांधवांच्यावतीने करणदादा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी नगरसेवक अमर जैन, हेमंत कोठारी, पारस राका, अनिल पगारिया, प्रशांत छाजेड, मुकेश सुराणा, जितेंद्र बोरा, विनोद भंडारी, मनीष लुंकड, शिरीष सिसोदिया, प्रियश छाजेड यांसह मान्यवर उपस्थित होते.