पाळधी प्रतिनिधी : मा.ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनातून आणि जि.प. सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या पुढाकारातून जिपीएस मित्र परिवारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला रविवारी नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.
पहाटेच नागरिकांनी शिबिरस्थळी मोठी गर्दी केली. सकाळी सात वाजेपासून नोंदणीला सुरुवात झाली आणि दिवसभरात एकूण ८१० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी २३० रुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड होऊन त्यांना पनवेल येथील सुप्रसिद्ध शंकरा नेत्र रुग्णालयात पाठविण्यात आले.
रुग्णांच्या नोंदणीपासून तपासणी, निदान आणि पुढील प्रक्रियेपर्यंत स्वतंत्र व्यवस्था शिबिरात उपलब्ध होती. उपस्थित प्रत्येकासाठी नाश्ता व जेवणाची मोफत सोय करण्यात आली होती. संपूर्ण सेवा विनामूल्य दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
दृष्टीदान या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, अनेक रुग्णांनी व ज्येष्ठ नागरिकांनी नेत्यांचे आभार व्यक्त केले. समाजोपयोगी कामात सातत्याने पुढाकार घेणाऱ्या गुलाबराव पाटील, प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या प्रयत्नांचे नागरिकांतून कौतुक होत आहे.
शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी शंकरा हॉस्पिटलची तज्ञ टीम, डॉ. राहुल चौधरी डॉ विजय ब्राम्हणे , असद अन्वर सायली उटेकर वैशाली राऊत पाळधी व चांदसर आरोग्य केंद्रातील कर्मचारी वृंद तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय चव्हाण सर डॉ निखिल शिंदे डॉ ऋषिकेश झंवर डॉ प्रीती पाटील संदीप पाटील हर्ष भट रिकुल चव्हाण तसेच जिपीएस मित्र परिवार, शिवसेना व युवासेना कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
जलपुरवठा क्षेत्रातील कार्यामुळे ‘पाणीवाला बाबा’ म्हणून ओळख निर्माण झालेल्या नेत्यांची आता नागरिकांमध्ये ‘दृष्टी देणारा बाबा’ म्हणूनही नवी प्रतिमा तयार होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.













