जळगाव (प्रतिनिधी) माझ्या मागे ईडी लावली, तर मी सीडी लावेन, असे खडसे म्हणाले होते. त्यामुळे बघूया पुढे काय होते ते. असे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले. गुलाबराव पाटील हे सद्या नाशिक दौऱ्यावर आहेत.
नाशिक मध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एकनाथ खडसे यांना ईडीने ताब्यात घेतले, त्यांच्या घरावर नोटीस बजावली, अशी चर्चा काल सुरू होती. या बाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, खडसे काल जळगावात होते, याची मला माहिती होती. मात्र, मी नाशिककडे निघाल्यानंतर मला सायंकाळी पत्रकारांच्या माध्यमातून समजले ते घरी नाहीत. परंतु त्यांनी (भाजपने) माझ्या मागे ईडी लावली, तर मी सीडी लावेन, असे खडसे म्हणाले होते. त्यामुळे बघूया पुढे काय होते ते. ईडी प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांचे जावई कारागृहात आहेत. या प्रकरणी कायद्यानुसार चौकशी होईल, जे दोषी असतील, त्यांना शिक्षा होईल, जे दोषी नसतील, ते बाहेर राहतील.
केंद्र सद्या ईडी चा गैरवापर करते आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, होय ईडीचा सर्रास गैरवापर होत आहे. पोलिस ज्याप्रमाणे एलसीबीचा वापर करतात, त्या प्रमाणे हा वापर होत आहे. मात्र सतत वापरामुळे ईडीचे म्हहत्व कमी होईल, त्यामुळे त्याचा दरारा कमी होईल. कारण ईडी हे ब्रह्मास्त्र आहे. पुराणकाळात ज्या वेळी राक्षस मातला जाई, त्यावेळी देव ब्रह्मास्त्र बाहेर काढत होते. आता केंद्र सरकार या ब्रह्मास्त्रचा उपयोग सर्रास गैरवापर करीत आहे, हे चुकीचे आहे.