अमळनेर (प्रतिनिधी) तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी मंगरूळ येथील अंबर राजाराम पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांची तर सचिवपदी मुंदडा माध्यमिक विद्यालयाचे प्रभाकर विंचुरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी कुर्हे येथील सर्जेराव शिसोदे तर सदस्यपदी अनिता बोरसे, प्रमोदिनी पाटील, संजीव पाटील, सैंदाने, मनोहर सूर्यवंशी यांचा समावेश आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आर. एम. पाटील, एस. डी. देशमुख, प्राचार्य एम. ए. पाटील, मुख्याध्यापक तुषार पाटील यांचे सहकार्य लाभले. नूतन कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.