नशिराबाद (प्रतिनिधी) नशिराबाद गावात समस्त माळी पंच मंडळातर्फे आणि थोर पुरुषांच्या व वडीलधारी मंडळींच्या मार्गदर्शनातून संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री संत शिरोमणी सावता महाराज, श्री महादेव परिवार आणि नंदी मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा:
27 फेब्रुवारी:
नशिराबाद गावातील मुख्य चौकातून विविध देवदेवतांच्या मूर्त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात येईल. या मिरवणुकीत श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री संत शिरोमणी सावता महाराज आणि इतर देवदेवतेंची मूर्त्यांची प्रतिष्ठापना होईल.
28 फेब्रुवारी:
श्री मूर्त्यांच्या जवळ होम हवन, ध्यानधिवास, फलाधिवास आणि जलधिवास अशा पूजन विधींचे आयोजन करण्यात येईल.
1 मार्च:
श्री मूर्त्यांचे पूजन आणि संस्कार विधी सोहळा पार पडेल.
2 मार्च:
श्री मूर्त्यांच्या प्राणप्रतिष्ठा, सिंहासनावर स्थापना आणि कलश पूजनाचा कार्यक्रम होईल. यावेळी परमपूज्य प्रसाद जी महाराज अंमळनेर आणि फैजपूर येथील जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते कलश पूजन सोहळा पार पडेल.
दैनंदिन कार्यक्रमांची रूपरेषा:
सकाळी 5 वाजता: काकड आरती
सकाळी 7 वाजता: महाआरती विष्णुसहस्रनाम
साडेआठ वाजता: श्री विठ्ठल नाम जप
दुपारी 2 वाजता: श्रीमद् भागवत कथा – श्री सदाशिव जी महाराज
सायंकाळी 5 वाजता: हरिपाठ
रात्री 8 वाजता: कीर्तन सोहळा
कीर्तनकारांची सूची:
2 मार्च (रविवार): ह.भ.प. शिवाजी महाराज बावस्कर आळंदीकर
3 मार्च (सोमवार): ह.भ.प. पुरुषोत्तम जी महाराज बुलढाणा
4 मार्च (मंगळवार): ह.भ.प. योगी दत्तानंद जी महाराज शिंदखेडा
5 मार्च (बुधवार): ह.भ.प. अकूरजी महाराज गोवराई
6 मार्च (गुरुवार): ह.भ.प. संजयजी नाना महाराज धोंडगे मकरंद वाडी
7 मार्च (शुक्रवार): ह.भ.प. विलासजी महाराज गेजगे
8 मार्च (शनिवार): ह.भ.प. गजानन जी महाराज वरसाडेकर
9 मार्च (रविवार): ह.भ.प. सुनील शास्त्री महाराज यांच्या मधुर वाणीत काल्याच्या कीर्तनाची विशेष उपस्थिती.
यावेळी कार्यक्रमाला 8 मार्च (शनिवार): सायंकाळच्या सुमारात भव्य दिंडी सोहळा काढण्यात येईल. 9 मार्च (रविवार): काल्याच्या कीर्तन आणि महाप्रसादाने या किर्तन सप्ताहाची सांगता होईल.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. यशस्वीतेसाठी समस्त ग्रामस्थ नशिराबाद आणि माळी पंच मंडळ यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे.