पंढरपूर (वृत्तसंस्था) पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला दणका दिला. भाजपचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. ७५०० मतांनी समाधान आवताडे विजयी झाले आहेत.
सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके हे आघाडीवर होते. मात्र काही फेऱ्यांनंतर भाजपचे उमेदवार यांनी समाधान आवताडे यांनी आपली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली आणि दणदणीत विजय मिळवला आहे.
दरम्यान आज निवडणुकींच्या निकालानंतर विजयी मिरवणूक निघण्याची शक्यता असते म्हणून खबरदारी म्हणून प्रशासनाने पहिलेच जमावबंदीचे आदेश जारी केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात जमावबंदीचा आदेश दिले. यासोबतच घराबाहेर फिरुन मतमोजणीचा निकाल ऐकता येणार नाही. निकाल घरात बसून आकाशवाणी तसेच voter helpline app या माध्यमातून जाणून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.
पंढरपूर मंगळवेढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे निधन झाले. यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. येथे महाविकास आघाडीकडून भालके यांचे पुत्र भगीरथ भालके रिंगणात उतरले आहे. तर भाजपने समाधान आवताडे यांना मैदानात उतरवले आहे. या दोघांमध्ये ही प्रमुख लढत होत आहे. एवढ्या कोरोना काळतही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने येथे मोठ्या प्रमाणात प्रचारसभा घेऊन आपला जोर लावला आहे. दोघांनाही विजयाची अपेक्षा आहे. यामुळे आता ही जागा कोणाच्या पारड्यात पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.