धरणगाव (प्रतिनिधी) ग्रामस्थांच्या मागणी नुसार पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी व्यासपीठावरूनच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संपर्क करून धारागीर धरणातून अजनी व झिरी नदीला आवर्तन सोडण्याबाबत पालकमंत्र्यांनी निर्देश दिले. तसेच निमखेडा येथे स्मशानभूमी परिसरात सांत्वन शेड , नदीला संरक्षण भिंत , झुरखेडा येथे बाजार पट्ट्यात कॉन्क्रीटीकरण व स्मशानभूमी बांधकाम मंजूर करणार असल्याची ग्वाही दिली. जनतेने मला गुलाब म्हणून पाहिले व मी शेवटपर्यंत गुलाब म्हणूनच राहील असा विस्वास व्यक्त करून मतदार संघात चौफेर विकास साधत आहे. आम्ही गाजर दाखविणारे नसून बोलतो त्याप्रमाणे विकास कामे करणारे आहोत असे प्रतिपादन केले. झुरखेडा गावाबद्दल जुन्या आठवणीना उजाळा देत ग्रा.पं. पदाधिकारी व ग्रामस्थांनी राजकीय मतभेद विसरून गावात एकोपा ठेवा व गावाच्या सर्वांगीण विकासाठी कटिबध राहण्याचा सल्लाही पालकमंत्र्यांनी दिला. झुरखेडा येथे नव्याने निवडून आलेल्या ग्रा.पं.सरपंच , उपसरपंच व सदस्यांचा सत्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
पालकमंत्र्यांचा चौफेर विकास जनतेला भारावणारा – मान्यवर सूर
यावेळी जिल्हा प्रमुख निलेश पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, तालुका प्रमुख डी.ओ. पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर सांगितले की, जिल्ह्यासह मतदार संघात पालकमंत्री गुलाबभाऊ यांनी चौफेर विकास केला असून प्रत्येक क्षेत्रात गावा -.गावात जनहितासाठी भरघोस निधी दिल्याने जनताही त्यांच्या विकासाने भारावलेली आहे. गुलाबभाऊ यांनी कॅबिनेट मंत्री असूनही मतदार संघात प्रत्येकाच्या सुखदु:खात सहभागी होवून सतत संपर्क ठेवला. मतदार संघातील प्रत्येक गावात मागणी पेक्षाही जास्त निधी देवून सर्वांगीण गाव विकास साधण्याचा प्रयत्न केलेला आहे.
या कामांचे झाले लोकार्पण व भूमिपूजन
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते निमखेडा व झुरखेडा येथील नव्याने उभारण्यात आलेले ग्रामपंचायत कार्यालय, सतखेडा ते झुरखेडा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाचे लोकार्पण, तर जलजीवन मिशन अंतर्गत दोन्ही गावातील पाणी पुरवठा योजना, तलाठी कार्यालय , गाव अंतर्गत व दलित वस्तीत पेव्हिंग ब्लॉक, भूमिगत गटार व गावांतर्गत दुसखेडा भागात डांबरीकरण, निमखेडा तारखेडा या आदिवासी वस्तीत रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करणे अश्या विविध विकास कामांचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संजय चौधरी सर यांनी केले तर आभार सरपंच सुरेश पाटील यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच सदस्य, शिवसेना व युवसेना कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतेले. यावेळी जिल्हा प्रमुख निलेश पाटील, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, माजी, जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, माजी सभापती प्रमुख मुकुंदराव नन्नवरे, अनिल पाटील , सरपंच सुरेश पाटील, उपसरपंच संजय चौधरी, निमखेडा सरपंच छायाबाई पाटील, उपसरपंच शरद कोळी, ह.भ.प. मंगल पाटील, शहर प्रमुख विलास महाजन , विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, तालुका संघटक रवींद्र चव्हाण सर, सतखेडेकर गजानन पाटील, ग्रा. पं. सदस्य बबन पाटील, विमलाबाई विसावे, बापू जाधव, कल्पना पाटील, कांचन चौधरी, नाजबीन पिंजारी, मीनाबाई नन्नवरे, माधुरी चौधरी, दगा अण्णा पाटील, सोपान चौधरी, माजी पोलीस पोलीस पाटील, बाबुराव कोळी, माजी सरपंच दगडू पाटील, पो.पा.साहेबराव पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, परिसरातील सरपंच गणेश पाटील, जीवन पाटील, पानाचंद चौधरी, तौसीफ पटेल, मा.नगरसेवक बुटा पाटील, तुकाराम लनाना पाटील, युवासेनेचे आबा माळी, दिपक भदाणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.