चोपडा (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्यातर्फे आयोजित कायरोप्रॅक्टिस ट्रीटमेंट शिबिर शहरातील रोटरी भवन येथे माननीय तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांचे हस्ते संपन्न झाले.
कायरोथेरेपी ही एक उपचार पद्धत ज्यामुळे शरीरातील मज्जासंस्था आणि हाडांमधील समस्या दूर होतात आणि रुग्णाच्या समस्या केवळ त्याच्या अनुभवी हातांच्या मदतीने तपासतात. ६ दिवस चालनाऱ्या या शिबिराचा चोपडा शहर व ग्रामीण भागातील रुग्णांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन प्रकल्प प्रमुख रोटे. लिना पाटील यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात केले. तसेच अनेक रुग्णांना अनेक वर्षांच्या जुन्या दुखन्यापासून मुक्तता मिळाविता येत असल्या मुळे अश्या प्रकारचे शिबिर पहिल्यांदाच घेण्यात येत असल्या मुळे तहसीलदार साहेब यांनी रोटरी चे कौतुक केले.
या शिबिरात कुठल्याही प्रकारची गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, खांदेदुखी, सायटिका, ऍसिडिटी, पोट साफ न होणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्या अनेक रुग्णांना सेवा देण्यात येणार आहे. प्रसिद्ध कायरोप्रॅक्टिस थेरपीस्ट डॉ. संदीप नायक, डॉ. राजकुमार सिंगानिया आणि त्यांच्या टीम सहा दिवस सदर कॅम्प मध्ये आपली सेवा देणार आहेत. शरीराच्या नर्वस सिस्टीम आणि हाडांमध्ये आलेल्या त्रासाला ठीक करणाऱ्या व कुठल्याही प्रकारचे मेडिसिन अथवा औषध न देता दिल्या जाणाऱ्या थेरपीने या ट्रीटमेंटचा असंख्य रुग्णांनी २३ मे ते २९ मे दरम्यान रोटरी भवन चोपडा येथे होणाऱ्या शिबिराचे सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन चोपडा रोटरी तर्फे करण्यात आले आहे.
या उद्घाटन सोहळ्यास पास्ट प्रेसिडेंट रुपेश पाटील, सचिव अर्पित अग्रवाल प्रकल्प प्रमुख लिना पाटील, कायरोप्रॅक्टर संदीप नायक, डॉ.राजकुमार सिंघानिया व त्यांची टीम तसेच रोटरी चे एम डब्लू पाटील, नितीन अहिरराव, व्ही.एस.पाटील, पंकज बोरोले,पवन गुजराती,गौरव महाले,विपुल छाजेड, चंद्रशेखर कोष्टी विलास कोष्टी, ईश्वर सौंदांनकर,अरुण सपकाळे,प्रदीप पाटील,महेंद्र बोरसे,नयन महाजन आदी उपस्थित होते.