TheClearNews.Com
Monday, February 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बिलवाडी येथे १० कोटीचे विविध विकासकामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण !

ग्रामस्थांची व कार्यकर्त्यांची भक्कम साथ म्हणून होत आहे सर्वसमावेशक विकास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 7, 2024
in जळगाव, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यासह मतदारसंघातही सर्वांगीण विकासासाठी सर्वच क्षेत्रातील कोट्यावधींची कामे केली असून काही अनेक मंजूर आहेत. कुरकुर नाल्यावरील बांधलेल्या ८ कोटींचा पूल व रस्ते शेतकऱ्यांसाठी आधारवड ठरत आहे. भागपुर धरणाचे काम एक ते दीड वर्षात पूर्ण होवून सिंचन क्षमतेत वाढ होणार असल्याने या परिसरातील १५- २० गावांतील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. बजेट अंतर्गत पाथरी – म्हसावद रस्ता व जवखेडा- वडली रस्ता आणि बिलवाडी ते वडली श्रीकृष्ण मंदिरा पर्यतचा रस्ता (२ कोटी ५०) लाखाच्या कामाला ८ दिवसात सुरुवात होणार आहे. कार्यकर्त्यांची व ग्रामस्थांची भक्कम साथ आहे म्हणून सर्वसमावेशक विकास होत आहे. केवळ मतांपुरते राजकारण कधीही केले नाही. जातीपातीच्या राजकारणापेक्षा विकास कामांना महत्व दिले आहे. मतदार हाच माझा समाज असून विकास हेच माझे ध्येय असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बिलवाडी येथे १० कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण प्रसंगी जाहीर सभेत केले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी भव्य सत्कार केला. यावेळी सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी भगवे ड्रेस परीधान केल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शाळेच्या मुलीनी ईशस्तवन व स्वागत गीत म्हटले.

यावेळी पालकमंत्री पुढे म्हणाले की, भवानी मातेच्या मंदिराचा “क” वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश करणार असून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून पाथरी ते बोरनार, डोमगाव ते म्हसावद, रामदेववाडी ते म्हसावद जवखेडा ते सुभाषवाडी या रस्त्यांना लवकरच मंजुरी मिळणार असल्याने शेतकऱ्यांचा रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. म्हसावद ग्रामीण रुग्णालयाच्या ३० कोटीच्या बांधकामाला महिनाअखेर प्रशासकीय मंजुरी मिळणार असल्याची ग्वाही दिली. तसेच जिल्हा प्रमुख निलेश पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, रमेश आप्पा पाटील, तालुका प्रमुख शिवराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केली.

READ ALSO

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

या कामांचे झाले लोकार्पण !
नविन ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम (२० लक्ष ), बिलवाडी ते बिलखेडा रस्ता डांबरीकरण (१ कोटी), पाण्याची टाकी व पाईपलाईन (३० लक्ष), बिलवाडी कडुन बिलखेडा रस्ता वरिल पुलाचे बांधकाम (१.५ कोटी), बिलवाडी फाटा ते डोमगांव रस्ता डांबरीकरण (४ कोटी), स्मशानभुमीकडे जाणारा रस्ता काँक्रीटकरण (६ लक्ष), स्माशानभुमी येथे काँक्रीटकरण व पेव्हिंग ब्लॉक बसविणे (३ लक्ष), डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व छ. शिवाजी महाराज चौक सुशोभीकरण (३ लक्ष), दलित वस्तीमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविणे (३ लक्ष), जि.प. मराठी शाळेकरीता संरक्षण भिंत बांधकाम (१२ लक्ष), वार्ड क्र. १ मध्ये काँक्रीटकरण, नवीन गटार बांधकाम (२१ लक्ष), वार्ड क्र. २ मध्ये पेव्हिंग ब्लॉक व काँक्रीटकरण (९ लक्ष), भगतवाडी येथील काँक्रीटकरण (६ लक्ष), विठ्ठल मंदिर जवळ सभामंडप (१० लक्ष), वार्ड क्र. ३ मधे पेव्हिंग ब्लॉक बसविणे (६ लक्ष), नदिवरील संरक्षण भिंत (१५ लक्ष), नदिवरील सिमेंट बंधारे बांधकाम (१ कोटी २० लक्ष), गुरांचा गावहाळ बांधकाम (२ लक्ष ) अश्या १० कोटी निधीतून खर्च करण्यात आलेल्या विकास कामांचे लोकार्पण विधिवत पूजा करून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 15, 2026
जळगाव

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026
गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
भुसावळ

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

February 14, 2026
जळगाव

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

February 14, 2026
गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
Next Post

साडे सहा लाखांची लाच स्विकारताना ग्रामसेवकासह खाजगी पंटर ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चालकाचे नियंत्रण सुटले, कार ओढ्यात कोसळली ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू !

October 31, 2023

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 16 मार्च 2024 !

March 16, 2024

तेलंगणा विधानसभा निवडणूक : माजी खासदार ए.टी.नाना पाटील यांची प्रभारी म्हणून नियुक्ती !

November 13, 2023

पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सुरू !

June 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group