कराड (सातारा) मागील दहा वर्षांतील संपत्तीचे विवरण मागत राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. दरम्यान, या नोटिशीला २१ दिवसांत उत्तर द्यायचं असून प्रत्यक्ष हजर राहण्यासही सांगण्यात आले आहे.
शरद पवार यांना बजावण्यात आलेल्या नोटीसवर बोट ठेवत चव्हाण यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर आपले परखड मत व्यक्त केले. सत्तेचा वापर कसा करायचा?, तो कोणासाठी करायचा?, याबाबत भाजपने नियोजनबद्धपणे व्यूहरचना केली आहे. त्यानुसार सगळं काही सुरू असतं. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना अशीच नोटीस आली होती आणि आता मला नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यावर योग्यते स्पष्टीकरण मी देणारच आहे. सत्तेचा वापर कसा करायचा हे भाजपला चांगले माहीत आहे, इतकेच मी म्हणेन, असे विधान चव्हाण यांनी केले.