जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुक्यातील एका गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेत इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनने अभिनव उपक्रम राबविला आहे. इनरव्हील क्लब ऑफ न्यूज जेनतर्फे शाळेत आवश्यक सोयसुविधा उपलब्ध करून देत ई लर्निंग सुविधा देखील दिली आहे.
इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनने नुकतेच धरणगाव तालुक्यातील एका गावात जि.प.शाळेत अभिनव उपक्रम राबविला. क्लबतर्फे शाळेत घेण्यात आलेल्या प्रकल्पात शुद्ध पाण्यासाठी आरओ वॉटर प्युरीफायर, पाण्याच्या टाक्या, सॅनिटरी बेसीन, सर्व प्लंबिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. इतकंच नव्हे तर शाळा डिजीटल करण्यासाठी २ स्मार्ट टीव्ही आणि ई लर्निंग सुविधा देखील बसविण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या मौखिक आरोग्यासाठी इंडियन डेंटल असोसिएशनसोबत एक मोफत दंत तपासणी शिबीर घेण्यात आले. विद्यार्थ्यांची दंत तपासणी करीत दात घासणे कसे महत्वाचे आहे? याबद्दल जनजागृती केली. तसेच क्लबतर्फे तंबाखू आणि मादक पदार्थांच्या जनजागृतीवर देखील एक उपक्रम राबविण्यात आला. त्यात मादक पदार्थांचे तोटे सांगण्यात आले. जनजागृतीसाठी आम्ही तंबाखू आणि ड्रग्जशी संबंधित विविध प्रकारचे पोस्टर तयार करून चिटकवण्यात आहे. जि.प.शाळेतील प्रकल्पासाठी इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनच्या अध्यक्षा नेहा संघवी, सचिव इशिता दोषी यांच्यासह मुनीरा मास्टर, सेजल खटवानी, प्राचार्या रफिया तडवी यांनी परिश्रम घेतले.