मुंबई (वृत्तसंस्था) माझ्या स्ट्राईक रेटबद्दल होत असलेली टिका मी वाचली आहे. मला लोकांना काही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. मी बराच काळापासून क्रिकेट खेळत आहे. टीममधील माझी जबाबदारी मला माहिती आहे. माझं काम लोकांना खूश ठेवणे ही नाही. टीम मॅनेजमेंटनं दिलेलं काम पूर्ण करणं हे माझं टार्गेट आहे. असं म्हणत भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने स्लो बँटिंग स्ट्राईक रेटवरुन होत असलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरी वन-डे टीम इंडियानं ४ विकेट्सनं जिंकली. कॅप्टन मिताली राजनं नाबाद ७५ रनमुळे भारताला या मालिकेतील पहिला विजय मिळवता आला. या खेळीच्या दरम्यान मितालीनं महिला क्रिकेटच्या सर्व प्रकारात सर्वात जास्त रन करणारी बॅटर हा विक्रम देखील केला. या सर्व कामगिरीनंतरही मिताली राजच्या खेळावर आक्षेप घेतले जातात. ‘वन-डे क्रिकेटमध्ये खेळताना मितालीचा स्ट्राईक रेट कमी आहे,’ असा टिकाकारांचा आक्षेप आहे. तिसऱ्या वन-डेनंतर पत्रकारांशी बोलताना मितालीनं या आक्षेपाला उत्तर दिले. “माझ्या स्ट्राईक रेटबद्दल होत असलेली टिका मी वाचली आहे. मला लोकांना काही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. मी बराच काळापासून क्रिकेट खेळत आहे. टीममधील माझी जबाबदारी मला माहिती आहे. माझं काम लोकांना खूश ठेवणे ही नाही. टीम मॅनेजमेंटनं दिलेलं काम पूर्ण करणं हे माझं टार्गेट आहे.एखाद्या टार्गेटचा पाठलाग करताना आक्रमक खेळ करण्यासाठी योग्य बॉलर्सची निवड तसेच स्वत:च्या क्षमतेवर विश्वास या गोष्टी आवश्यक आहेत.” असे मितालीने सांगितले.
आयर्लंड विरुद्ध २६ जून १९९९ रोजी मी मिल्टन केयेन्स येथे मिताली राजने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यावेळेसपासून ते आत्तापर्यंत हा प्रवास सोपा नव्हता. आव्हानांनी भरलेला हा रस्ता होता. या प्रवासात असे अनेक प्रसंग आले जेव्हा मला वाटलं की आता बस झालं…. परंतु अशा काही गोष्टी घडत होत्या ज्या गोष्टींनी मी खेळत राहावं असं मला वाटायचं… आणि आता माझ्या क्रिकेट कारकिर्दीला २२ वर्षे पूर्ण झालीत… रन्सची भूक आणखीही थांबलेली नाहीये.. पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये दिमाखदार खेळ करण्याचा मानस मितालीने बोलून दाखवला.