जळगाव (प्रतिनिधी) सय्यद मुश्ताक अली T20 आंतर राज्य क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट संघात जळगावच्या जगदीश झोपे याची निवड करण्यात आली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे आयोजित सय्यद मुश्ताक अली T20 आंतर राज्य क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ आज पुणे येथे जाहीर करण्यात आला. सय्यद मुश्ताक अली T20 आंतर राज्य क्रिकेट स्पर्धा ४ नोव्हेंबर २०२१ पासून विविध मैदानावर सुरू होत आहे. महाराष्ट्र संघात जगदीश झोपेसह, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), नौशाद शेख (उप-कर्णधार), केदार जाधव, मुकेश चौधरी, अजीम काजी, शमशजमा काजी, मनोज इंगळे, सतेजित बच्छाव, यश नाहर, रणजित निकम, आशय पालकर, प्रदीप दाधे, स्वप्नील फुल्पगार, दिव्यांग हींगणेकर, सुनिल यादव, तरांजित सिंग धिल्लोन, धनराजसिंग परदेशी, स्वप्नील गुगळे, पवन शाह यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल जगदीश झोपे याचे जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन व संपूर्ण कार्यकारी मंडळातर्फे अभिनंदन करण्यात आले.