भुसावळ प्रतिनिधी – जगाच्या पाठीवर फक्त भारत देश आहे,जेथे एकत्र कुटुंब पद्धतीने जीवन जगतात. संयुक्त कुटुंब पद्धतीने भावी पिढीला योग्य मार्गदर्शन मिळून सर्वांगीण उन्नती होण्यासाठी मदत होते, त्यामुळेच एकत्र कुटुंब पद्धती टिकवणं ही आपली गरज आहे, असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापक श्रीराम महाजन यांनी आज भुसावळ येथे केले.
ओम सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठान संचलित वासुदेव जेष्ठ नागरिक संघाची मासिक सभा रिंग रोड,भुसावळ या ठिकाणी झाली. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव सतीश जंगले, प्रमुख पाहुणे श्रीराम महाजन,भानुदास पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विश्व प्रार्थना आणि हनुमान चालिसा पठणाने झाली.
“मी आणि माझे कुटुंब”या विषयावर महाजन सर बोलत होते. पुढे ते म्हणाले की एकत्र कुटुंब ही गरज असली तरी प्रत्येक कुटुंबातील सदस्य हा स्वतंत्र विचार करणारा आहे.वैयक्तिक पातळीवर मतभेद निर्माण होणार नाही,यासाठी कुटूंबीक आचारसंहिता फार गरजेची आहे.विविध प्रसंगात आई,वडील यांनी कसे वागावे, या संदर्भात वेगवेगळे उदाहरण देत सर्व जेष्ठ नागरिकांना अंतर्मुख केले.
यावेळी श्रीमती लता मुरलीधर इसे,श्रीमती इंदुबाई गिरधर पाटील,अशोक राजाराम नेहेते,हरी नाटू पाटील यांचे वाढदिवसा निमित्ताने उपरणे आणि बुके देत सत्कार करण्यात आले.
यावेळी संजीव चौधरी, परशुराम चौधरी, मंगला कोळी,सोपान बहाटे,लता पाटील,नारायण माळी, लक्ष्मण पाटील,मोहन वारके,ज्ञानेश्वर पाटील,सुलभा फालक,मधुकर पाटील, बुलाखी बेलसरे, प्रमिला निळकंठ चौधरी, ज्ञानदेव घनश्याम चौधरी,चंद्रकांत पितांबर चौधरी ,अलका हेमराज इंगळे, लीलावती विश्वनाथ वाणी,लता अशोक जंगले, लोटू विठ्ठल फिरके,सौ सुलोचना अनिल पाटील,सुरेश वामन नेहेते ,दिलीप सिंग पाटील, खुशाल बुधा महाजन,लीलाधर रामचंद्र पाटील, वैशाली तुकाराम पाटील, तुकाराम वासुदेव पाटील, ज्ञानेश्वर पाटील विश्वनाथ नामदेव वाणी, यमुनाबाई वारके,विजया धनराज पाटील,गणेश प्रल्हाद सरोदे, राजाराम लक्ष्मण चौधरी, ज्योती विश्वनाथ चौधरी, इंदुबाई सपकाळे, आदी जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रभाकर मुरलीधर झांबरे,धनराज वामन पाटील,भास्कर खाचणे,दिलीप मराठे ,प्रमोद बोरोले यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्रकाश पाटील, प्रमुख पाहुणे परिचय आणि आभार प्रदर्शन सतीश जंगले यांनी मांडले.विश्व कल्याण साधनारी प्रार्थना होऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.