जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा पत्रकार संघा तर्फे दरवर्षी ६ जानेवारी पत्रकार दिन स्व. बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार यांची अभिवादन म्हणून जिल्हातील सर्व पत्रकार जिल्हा पत्रकार संघात मोठया उत्साहाने साजरा करतात. परंतु मागील फेब्रुवारी २०२० पासून कोरोनाने थैमान घातला असून सर्व कार्यक्रमावर बंधन आलेली आहेत. तरी आरोग्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी यांनी जी नियमावली जाहीर आहे. ती अनुसरून दि. ६ जानेवारी २०२१ पत्रकार दिन कार्यक्रम अत्यांत साधे पणाने साजरा होत आहे.
स्व. बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून ठराविक अंतर राखून मास्क लावून कार्यक्रम होणार आहे. तरी जिल्हातील पत्रकारांना विनंती की आपण आपल्या तालुक्याच्या ठिकाणी हा कार्यक्रम साधेपणाने साजरा करावा. जिल्हा पत्रकार संघ तर्फे हा कार्यक्रम दि. ६ जानेवारी २०२१ बुधवारी दुपारी ३ वाजता पत्रकार भवनात साजरा होणार आहे. कार्यक्रमा नंतर मोजके पदाधिकारी जिल्हाधिकारी व जिल्हा माहिती अधिकारी यांना ज्येष्ठ पत्रकार पेन्शन व विविध मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे. लवकरच जळगाव जिल्हा पत्रकार संघात जिल्हातील पत्रकार यांचा साठी १ दिवसीय कार्यशाळा (वर्कशॉप) कार्यक्रम घेण्यात येणार आहे. असे विजय बापु पाटील, नरेंद्र नेहेते, अशोक भाटिया, अनिल पाटील, जमनादास भाटिया, दिलीप शिरुडे, भिका चौधरी, किसनराव जोर्वेकर, प्रमोद पाटील, रितेश भाटिया यांनी कळविले आहे.