कासोदा ता.एरंडोल (प्रतिनिधी) येथील समाजसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ. नुरुद्दीन मुल्लाजी यांना स्वामी विवेकानंद जीवन गौरव पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
नुरुद्दीन मुल्लाजी यांना त्यांच्या उत्कृष्ट समाजकार्याबद्दल तथा पत्रकारितेबद्दल वल्लरी फाउंडेशन हैदराबादच्या वतीने स्वामी विवेकानंद जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.