जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मेहरूण भागातील रहिवासी व जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे एमबीबीएसचे शिक्षण घेणारी कनसा परवीन विकार अहेमद ही एमबीबीएसची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होताच तिने औरंगाबाद हुन येऊन मणियार बिरादरीच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये सुरू असलेल्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णांची पाहणी करून त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केली.
यावेळी बिरादरीचे अध्यक्ष तथा हॉस्पिटलचे मुख्य समन्वयक फारुक शेख यांनी तिचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी तिचे वडील विकार अहेमद, कोविड सेंटरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रियाज बागवान, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एजाज खान, डॉ. मोहसीन शेख, व्यवस्थापक रइस शेख आदी उपस्थित होते.
कनसा परवीन ही जिल्हा सामान्य रुग्णालयातील सेवानिवृत्त मेडिकल स्टोर इन्चार्ज सगीर अहमद यांची नात असून, के परविन मेडिकल स्टोरचे संचालक विकार अहमद यांची मुलगी आहे. तर डे नाईट मेडिकल स्टोरचे संचालक इफ्तेखार अहेमद यांची पुतणी आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.