धरणगाव(प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक केसरी रेशन धारक असून त्यांना रेशन दुकानदार धान्य देण्यात यावे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते पी.एम.पाटील यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना नुकतेच दिले आहे.
जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक केसरी रेशन धारक असून त्यांना रेशन दुकानदार धान्य देत नाहीत, असे हजारो कार्डधारक जिल्ह्यात आहेत. या संदर्भात महाविकास आघाडी सरकार असताना अन्न नागरी पुरवठा मंत्री भुजबळ साहेब यांना सुद्धा निवेदन देण्यात आले होते. रेशन धारकांना धान्य पुरवठा पूर्ण मिळत नसल्यामुळे ते केशरी रेशनधारकांना धान्य देऊ शकत नाही. यासाठी स्वतंत्र कोठा वाढवून मिळाल्यास तरच यांना धान्य देता येईल. असे जिल्हा पुरवठा अधिकारी सूर्यवंशी साहेब यांनी सांगितले. या संदर्भात अन्न नागरी पुरवठा मंत्री व सचिव यांना जळगाव बाळासाहेब ठाकरे शिवसेनातर्फे लेखी निवेदन देण्यात येणार असल्याचे पी.एम. पाटील सर यांनी सांगितले.