धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील पोलीस लाईन जवळील वस्तीत खाजा नाईक जयंती उत्साहात पार पडली. यावेळेस कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कैलास माळी यांनी खाजा नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास उपस्थित पंकज अमृतकर,अनिल पाटील,विजय मालाचे,कल्पेश महाजन,संतोष सोनवणे,पल्लवी सिंघणे,मनीषा माळी, स्वाती चौधरी, यांच्यासह आदी उपस्थित होते. तर अंकुश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तसेच सूचित जैन यांनी उपस्थितांचे आभार मानले.











