मुंबई (प्रतिनिधी) राहीलं साहिलं आज करतो, PenDrive घेऊन येतोये, भेटुया, सभागृहात असे ट्विट करून शिवसेनेचे विरोधी पक्षेनेते अंबादास दानवे यांनी केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
किरीट सोमय्या यांचा खळबळजनक व्हिडीओ संदर्भात ‘लोकशाही’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. या व्हिडीओत आक्षेपार्ह स्थितीत सोमय्या दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अंबादास दानवे यांनी एक ट्विट केलं आहे. राहीलं साहिलं आज करतो, pendrive घेऊन येतोये. भेटुया, सभागृहात! असे म्हणत अंबादास दानवे यांनी ट्विट केलं आहे.
याच्या आधी दानवे म्हणाले की, किरीट सोमय्यांनी अनेक प्रकरणात ईडीकडे वेगवेगळ्या तक्रारी केल्या आहेत.
ईडी यांच्या तालावर नाचते असेही ऐकले आहे. आणि अशा साधनसूचतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपच्या नेत्याचा हा व्हिडीओ आता समोर येतोय. परंतु, नैतिकता, परंपरा या सगळा विषय आहे की नाही, असे विषय असताना भाजप देशाची संस्कृती, हिंदुत्वाताची संस्कृती, अध्यात्माची संस्कृतीवर भाषण करतात आणि त्याच पक्षाचा नेता अशाप्रकरे समोर येतोयं हे दुर्दैवी आहे. या घटना कुठं झाल्या, कशा झाल्या, कोणकोण आहे, याची चौकशी गृहमंत्रालयाने करावी, असेही दानवे यांनी म्हटले आहे. याबाबतचे वृत्त लोकशाहीने दिले आहे.
















