मुंबई (वृत्तसंस्था) विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदन प्रस्तावावर बोलताना आमदार गुलाबराव पाटील यांनी विरोधकांच्या टीकेला सडेतोड प्रतिउत्तर दिल आहे. आम्ही बंड नाही तर उठाव केला. आम्ही शिवसेना सोडली नाही. आमची चिंता नको, असं म्हणत शिवसेना सोडण्याच्या मुद्दयांवर होत असलेल्या आरोपांवर टीका केली आहे.
आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. त्यानंतर 164 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. आम्ही शिवसेनेतच आहोत त्यामुळे निवडणुका हरण्याचा प्रश्न येत नाही. 40 आमदार फुटतात ही आजची आग नाही.
तसेच आम्हाला आमचे घर सोडून येण्याची इच्छा नाही. बाळासाहेबांना आणि त्यांच्या मुलाला दु:ख देण्याची आमची इच्छा नाही, सर्व आमदार साहेबांना त्रास सांगण्यात जात होते. पण चहापेक्षा किटली गरम. आमचे फोनही घेतले जात नव्हते, अशी खंत आमदार गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.
पुढे ते म्हणाले की, हिंदुत्त्वाचे संरक्षण करणारी संघटना म्हणजे शिवसेना. 1990 वेळी भाजपसोबत पहिल्यांदा शिवसेनेने युती केली. मी १७ वर्षांचा असताना शिवसेनेत काम सुरु केलं. आम्हाला पुढे निवडणूक लढायला लागेल असं वाटलंही नव्हतं. जे मिळाले ते बाळासाहेबांच्या आशिर्वादाने मिळाले. आज आम्हाला बंडखोर म्हटले जाते आहे.
आज आम्ही बंड केलेले नाही तर उठाव केला आहे. माझ्यासारख्या टपरीवाल्यावर टीका केली गेली. मला पुन्हा टपरीवर पाठवण्याची भाषा करण्यात आली. टपरीवाला म्हणून मला हिणवलं. पण, लक्षात ठेवा धीरुभाई अंबानीही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचे, मुख्यमंत्री रिक्षा चालवायचे हा फक्त इतिहास आहे.
















