मुंबई (वृत्तसंस्था) विधानपरिषद निवडणुकीसाठी (Election) एक एक मत मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडून आपापल्या पक्षांसह अपक्ष आणि लहान पक्षांवर डोळा आहे. दरम्यान, भाजप नेते प्रवीण दरेकर आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आज लोकल रेल्वेने प्रवास केला. बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीसाठी दोन्ही नेते मुंबईवरुन लोकल रेल्वेने विरारला रवाना झाले.
सर्वच पक्षांनी अपक्ष आमदारांच्या भेटगाठी सुरू केल्या आहेत. प्रवीण दरेकर आणि भाजप नेते गिरीष महाजन यांनी आज वाहतूक कोंडीची अडचण होऊ नये, म्हणून विरारसाठी लोकलने प्रवास केला आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी एक एक मत मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर व आमदार गिरीश महाजन हे बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला चर्चगेट स्टेशनहून लोकल ट्रेनने विरार करीता रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत सोबत आमदार मंगेश चव्हाणही आहेत.