जळगाव (प्रतिनिधी) नूतन मराठा महाविद्यालय मराठी विभाग आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा समारोपप्रसंगी सुप्रसिद्ध चित्रकार तथा लेखक राजू बाविस्कर यांची प्रमुख उपस्थिती लाभली,या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ के बी पाटील अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर मराठी विभाग प्रमुख प्रा ललिता हिंगोणेकर या देखील विचारपीठावर उपस्थित होत्या..
मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात प्रा ललिता हिंगोणेकर यांनी कार्यक्रमाची भुमिका स्पष्ट केली. पाहुण्यांचा परिचय प्रा.स्वाती कोळी यांनी करुन दिला. तर प्रमुख अतिथी मा राजू बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, जगात वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर साहित्य आणि कलेची आवड जोपासली पाहिजे, वर्गात ९० टक्के मार्क मिळवणारा विद्यार्थ्यांला सर्व शिक्षक आणि शाळा ओळखायची पण मला चांगलं चित्र काढतो म्हणून सर्व शिक्षक,शाळा आणि संपुर्ण गाव ओळखायचं असे प्रतिपादन केले.
“असे आम्ही घडलो: या कार्यक्रमात “आमची जडणघडण आणि मराठी भाषा” या विषयावर ते संवाद साधताना भाकरी मागून, ढोराची कातडी काढून,आमावशा मागत दफडं वाजवून कठीण प्रसंगातून जीवन जगताना अनेक चांगली माणसं मिळत गेली त्यांची बेरीज करत गेलो, चित्र काढता काढता जीवनाचं चित्र लेखनीतून मांडत गेलो आणि मराठी भाषेतील साहित्य शक्य तितके वाचत वाचत जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करत गेलो असेही त्यांनी सांगितले.
उपप्राचार्य डॉ के बी पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतात मराठी भाषा खुप समृद्ध असून तीच्यात जीवन समृद्ध करणारं साहित्य दडलेलं आहे ते आवर्जून वाचावे ते आत्मसात केले तर निश्चितच त्याचे चांगले परिणाम दिसून येतील असा विश्वास विद्यार्थ्यांना दिला. सुत्रसंचलन प्रा. रत्नाकर कोळी यांनी आभार प्रदर्शन प्रा स्वाती कोळी यांनी तर यशस्वीतेसाठी प्रा राकेश गोरसे यांनी परिश्रम घेतले. तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या प्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. पंधरवडा दरम्यान वक्तृत्व, निबंध, घोषवाक्य, काव्यवाचन आणि वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. यात जवळपास साठ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपले विचार व्यक्त केले.
निकाल
निबंध स्पर्धा वरीष्ठ महाविद्यालय
विषय- राष्ट्रीय एकात्मता टिकवायची असेल तर..
प्रथम- अपेक्षा सुभाष जाधव
द्वीतीय- पावरा दाज्या मानकऱ्या
तृतीय- दिनेश राजू राठोड
उत्तेजनार्थ- साक्षी सदाशिव बारसे
निबंध स्पर्धा कनिष्ठ महाविद्यालय
प्रथम- गौरांगी युवराज पाटील
द्वीतीय- साक्षी बाळकृष्ण काटे
तृतीय- भुमिका सचिन देशमुख
वक्तृत्व स्पर्धा
विषय- आदर्श नागरिक म्हणून माझी जबाबदारी..
प्रथम-आदीती विजय वाणी
द्वीतीय- अस्मिता राकेश बोरसे
तृतीय- माधवी प्रेमनाथ सोनवणे
काव्यवाचन स्पर्धा –
विषय- आवडीनुसार
प्रथम- ऋषीकेश रमेश धनगर
द्वीतीय- अनुश्री रत्नाकर कोळी
तृतीय- प्रेरणा रमेश धनगर
उत्तेजनार्थ-
घोषवाक्य स्पर्धा
विषय- माणुसकी आणि मानवता
प्रथम- पावरा दाज्या मानकऱ्या
द्वीतीय- जान्हवी विशाल पाटील
तृतीय- नेहा दिनेश सूर्यवंशी
उत्तेजनार्थ- सुवर्णा चंद्रभान आगे
वादविवाद स्पर्धा-
विषय- लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांची भुमिका योग्य दिशेने सुरू आहे/नाही
प्रथम- रितुषा महेश पुंडे
द्वीतीय- आदिती विजय वाणी
तृतीय- माधवी प्रेमनाथ सोनवणे