चोपडा (प्रतिनिधी) पंकज शैक्षणिक व सामाजिक ,संस्था संचलित पंकज बाल संस्कार,केंद्र येथे आज दि. 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या आधी प्रतिमा पूजन विभाग प्रमुख रेखा पाटील यांनी केले व नंतर मिना माळी यांनी मुलांना लोकमान्य टिळकांबद्दल विचार मांडले व नंतर मुलांनी सुद्धा आपले विचार मांडले. मुलांचे वकृत्व अतिशय छान झाले. मुलांनी लोकमान्य टिळकांच्या पोशाखासारखे कपडे परिधान केले होते. त्यानंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
अण्णाभाऊ साठे यांचे विचार देखील मांडण्यात आले. हा सर्व कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी बारी मॅडम, भावना दीक्षित, संध्या मॅडम, जयश्री हिंगे, अनिता बराटे, योगिता कोळी, सुनंदा विसावे व मदतनीस ताई यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे सांगता झाली.













