मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. अजित पवार यांनी आर्थिक वर्ष 2022-23 चा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला. महाविकास आघाडी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे.
तुळापूर येथे संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी २५० कोटीची तरतूद सरकारने केली आहे. आजच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्यात आले. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांची प्रोत्साहनपर मदत घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. यासाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली. याचा २० लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. भूविकास बँकेच्या ३४७८८ शेतकऱ्यांची ९६४ कोटीची कर्जमाफी करण्याची घोषणा आज पवार यांनी केली.
अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे
कृषी क्षेत्र हाच विकासाचा पाया आहे यावर आमचा विश्वास आहे
महिला शेतकऱ्यांना अधिक अनुदान देणार
शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांऐवजी 75 हजार अनुदान
नियमित कर्ज फेडणाऱ्या कर्जदारांना 50 हजारांचे अनुदान
हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारणार
अन्न प्रक्रिया योजना राबवणार
येत्या 2 वर्षात 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार
कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला प्रत्येकी 50 कोटी
कृषी संशोधनासाठी अधिकचा निधी
पंतप्रधान सिंचन प्रकल्प योजनेतून 11 प्रकल्प पूर्ण करणार
जलसंपदा विभागाला 13 हजार 252 कोटी रुपये
सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार
भरड धान्यावर विशेष भर देणार
गेल्या वर्षी नियमित वीज बील भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान घोषीत केले पण लागू करता आले नाही. ते या वर्षापासून सुरू करू
पीक विम्यासाठी केंद्र सरकारला मदत मागितली आहे, त्यांनी नाही केली तर आम्ही दुसऱ्या पर्यायांचा विचार करू
हळद पीकासाठी विषेश निधी 100 कोटींचे
कापूस आणि सोयाबीनसाठी 1000 कोटीचा विशेष निधी
शेततळ्यांचे अनुदान 75000 वर नेण्यात येत आहे
गोसीखुर्द प्रकल्पासाठी 853 कोटी
60 हजार कृषी पंपांना वीज देणार
बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी मिळवली. उत्तर देशी गाई आणि बैल वाढावे यासाठी 3 मोबाइल व्हॅन
मुंबईतील पशुवैद्यकीय रुग्णालयाला 10 कोटींचा निधी
प्रत्येक महसूल विभागात एक शेळी प्रकल्प
सुदृढ पशुधनासाठी 3 फिरत्या प्रयोगशाळा उभारणार
आरोग्य विभागाला 3364 कोटी रुपये
आरोग्य विभागासाठी काय?
वैद्यकीय पदव्युत्तर संस्था उभारणार
100 खाटांची महिला रुग्णालये तयार करणार
येत्या वर्षात 1200 कोटी रुग्णालय खाटांची संख्या वाढवणार
युक्रेन मध्ये वैद्यकीय अभ्यासासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता राज्य सरकारची भरीव योजना
इतर घोषणा
हवेलीत संभाजीराजें महाराजांचं स्मारक उभारणार, 250 कोटींची घोषणा
स्टार्टअप योजना कौश्यल्य विकास योजना 615 कोटी रुपये
मुंबई विद्यापीठ कलीना परीसरात आंतरराष्ट्रीय लता मंगेशकर संगित विद्यालय 100 कोटी रुपये
1600 कोटी रुपये उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाला
प्रत्येक जिल्ह्यात इनोव्शन हब तयार करणार
गडचिरोलीला 5000 विद्यार्थ्यांना दर वर्षी कौश्यल्य वर्धनासाठी 30 कोटी रूपये
गटार सफाई करण्यासाठी स्वयंचलीत यंत्र आणणार
1619 कोटी रूपये उच्च व तंत्रज्ञान विभागाला या वर्षी देण्यात येत आहे
सफाई कामगारांना यापुढे गटार स्वच्छ करण्यासाठी स्वयंचलिय यंत्र
तृतीय पंथियांना ओळखपत्र आणि शिदापत्र दिले जातील
15000 कोटी रुपये अनूसूचीत जातींच्या कल्याणासाठी.
11 हजार 199 कोटी रूपये आदिवासी विकास कल्याण निधी
गडचिरोली माडिया भवन उभारणार
3000 कोटी सामाजीक कल्याण विभागाला
2400 कोटी महिला आणि बाल विकास विभागाला
2472 कोटी रूपये महिला व बालकल्ण्यान विभागाला दिले जातील
एसआरएच्या धर्तीवर मुंबईबाहेर झोपड्यांच्या दुरूस्तीसाठी 100 कोटी रूपये
7718 कोटी रुपये ग्रामविकास मंत्रालयाला
ग्रामीण भागात 6550 किमीचे रस्ते बांधले जातील.
500 कोटी रुपये कोकण सागरी महामार्गासाठी
समृद्धी महामार्गाचे 77 टक्के काम पूर्ण
पुढे गडचिरोली गोंदीया पर्यंत वाढवण्यात येत आहे
15773 कोटी रुपये MSRDC ला रस्ते विकासासाठी देणार
वसई, भाईंदर जलमार्गाने जोडणार 330 कोटी रूपये
मुंबई मेट्रो 3 लाईन नेव्ही नगर पर्यंत विस्तारणार
शिवडी नाव्हाशिवा प्रकल्पाचे 64 टक्के काम पूर्ण
3000 पर्यावरण पुरक बस पुरवणार
ST महामंडळासाठी 3003 कोटी रुपये
नगरविकास विभागाला 8 हजार कोटी
















