धरणगाव (प्रतिनिधी) बामसेफ आणि राष्ट्रीय मूलनिवासी संघाचे महाराष्ट्र राज्य अधिवेशन २७ ऑगस्ट, रोजी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, परभणी येथे होणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन टी.व्ही. नलवडे (निवृत्त न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालय) यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख उपस्थिती प्रदीप पोळ (उपायुक्त आदिवासी विकास प्रकल्प, ठाणे), एम.एम. कोटुळे (निवृत्त मुख्य अभियंता, महाजनको), विद्याधर माणगावकर (कामगार अधिकारी, परभणी), जयंत सोनवणे (उपायुक्त महापालिका परभणी), एस.आर.बरगे (प्रशासन अधिकारी उच्च शिक्षण, म.रा.) उपस्थित राहणार आहेत.
आधिवेशनात खालील विषयांवर प्रबोधन होणार आहे !
१) ओबीसी जातीनिहाय जनगणनेला होत असलेला विरोध २) छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी नाही मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल ३) २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पावत्या नष्ट का केल्या ? ४) ईव्हीएम मशीनच्या वापरातील संशयास्पद भूमिका व निवडणूक आयोगाद्वारे लोकशाहीचे मूल्य नष्ट करणे एक षडयंत्र ५) ‘संविधानिक अधिकार हे सत्ता आणि शक्तीचे स्रोत आहेत’ ६)समान नागरी संहिता लागू झाल्यामुळे आदिवासी कस्टमरी लॉ समाप्त होण्याचे संकट एक गंभीर चिंतन ७) स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही जातीय मानसिकतेतून अनु. जाती – जमातींवर होणारे अत्याचार… आदी विषयावर प्रा.डॉ.आनंद इंजेगावकर, हभप. गंगाधर महाराज कुरुंदकर, डॉ.सुभाष घरत (अध्यक्ष, मानव विकास संघटना रायगड), चेतन आगलावे, व्ही व्ही जाधव, गोरखनाथ वेताळ, कुंदाताई तोडकर, पी.के.मेश्राम, प्रा.विठ्ठलराव घुले परभणी, प्रा. डॉ.अनिल डोंगरे (क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) हे वक्ते प्रबोधन करतील. आधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष बामसेफ वामन मेश्राम असतील. दि. २७ ऑगस्ट, परभणी येथील अधिवेशनाला बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बामसेफ म.रा. कार्याध्यक्ष सुमित्र अहिरे, जिल्हाध्यक्ष प्रकाश इंगळे यासह धरणगाव बामसेफ व सहयोगी संघटनेकडून केले आहे.