जळगाव (प्रतिनिधी) येथील प्रसिध्द महावीर ज्वेलर्स तर्फे जळगाव शहरातील पाच महिलांना पिंक ऑटो घेण्याकरीता प्रत्येकी २० हजार रुपयाचे अर्थसहाय्य धनादेश महावीर ज्वेलर्सचे संचालक अजयभाऊ ललवाणी यांचे हस्ते देण्यात आले. या प्रसंगी उद्योजक विजय जैन, प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड.जमील देशपांडे, सचिव विजय वाणी, विश्वस्त संध्या वाणी, निलोफर देशपांडे, डॅा. सविता नंदनवार यांच्यासह तुकाराम सोनवणे, कविता सोनवणे उपस्थित होते.
शहरातील सुनिता सपकाळे, धनमाला सुरडकर, जयश्री पाटील, पुनम वानखेडे, विजेता सोनवणे या पिंक ऑटो भगीनिंना धनादेश देण्यात आले. दरम्यान मराठी प्रतिष्ठानतर्फे पिंक ऑटो घेणाऱ्या महिलांना विनामूल्य प्रशिक्षण दिले जाते. तसेच शासकीय दरात लायसन, परमीट, बॅच काढून दिले जातात. महावीर ज्वेलर्सतर्फे यापुर्वी सुध्दा 5 महिलांना अर्थसहाय्य दिले आहे. मराठी प्रतिष्ठानतर्फे उद्योजक अजयभाऊ ललवाणी यांचे अभार मानण्यात आले.