चोपडा (प्रतिनिधी) शहरात व जळगाव जिल्ह्यात कामगारांसाठी सह्याद्री श्रमिक असंघटित कामगार संघटना नुकतीच स्थापन झाली आहे. संघटनेच्या अध्यक्षपदी महेश पाटील यांची सचिव महेंद्र करनकाळे तर कायदेशिर सल्लागार म्हणून अॅड. किरण जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
सह्याद्री श्रमिक असंघटित कामगार संघटना ही श्रमिक संघ नोंदणी अधिनियम १९२६ नुसार शासन मान्यता प्राप्त संघटना असून संस्थेचा नोंदणी क्र. एनएसके /जे / २२८८ असा आहे. सदर संघटना ही सर्वसामान्य असंघटित कामगारांना त्यांचा हक्क व व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटत राहण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली आहे. विविध कल्याणकारी योजनांचा प्रसार, प्रचार करणे व राबविणे तसेच असंघटभत कामगारांचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक बेरोजगार, स्वयंरोजगाराचा सर्वे करून त्यांना न्याय मिळवून देणे व योजना व अन्याय, पिळवणूकीपासुन त्यांना न्याय मिळवून देणार आहे.
संघटनेचे अध्यक्ष महेश वसंतराव पाटील, सचिव महेंद्र पंडीत करनकाळे असुन अॅड. किरण जाधव हे कायदेशिर सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत. सर्व कामगारांनी संस्थेचे कार्यालय दुकान नं.२, अल्पबचत भवन जवळ, पंचायत समिती समोर, चोपडा जि. जळगांव येथे संपर्क करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.