मुंबई (वृत्तसंस्था) भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी ईडीच्या अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक यांच्यावर आरोपांची मालिका सुरूच ठेवली आहे. आज मोहित कंबोज यांनी नवाब मलिक हे चक्क वेश्याव्यवसाय चालवत असल्याचा खळबळजनक आरोप केला. नवाब मलिक हे डान्सबार चालवायचे, बांगलादेशातून मुली आणायचे आणि वेश्याव्यवसाय करायचे. या सगळ्याचे आपल्याकडे पुराव्याखातर व्हिडीओही असल्याचे म्हणत मोहित कंबोज यांनी मोठी खळबळ उडवून दिली आहे.
मुंबईत मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी नवाब मलिक यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवरही त्यांनी यावेळी निशाणा साधत नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नवाब मलिकांवर सनसनाटी आरोप करताना मोहित कंबोज म्हणालेत की, तुम्हाला ऐकून धक्का बसेल, कारण राज्यातला एक मंत्री डान्सबार चालवत होता. बांगलादेशातून मुली आणून मुंबईत वैश्याव्यवसाय आणायचं काम नवाब मलिक करत होते. अशा अनेक मुलींचे आम्ही स्टिंग ऑपरेशन केले आहेत. त्याचे व्हिडीओ आहेत आमच्याकडे.. ज्यात मुलींनी कबूल केलंय की नवाब मलिक जबरदस्ती त्यांच्याकडून मुंबईत हे काम करुन घेत होते.
लवकरच मी हे सगळे व्हिडीओ येणाऱ्या काळात तपास यंत्रणांना देणार आहे.. ही दुःखद गोष्ट आहे.. कुर्ल्यात लोक घाबरायचे या गोष्ट बोलायला. एक मंत्री ड्रग्जमध्ये, एवेश्या व्यवसायात सामील आहे, त्याच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध अससल्याचा आरोप,, बेनामी आणि भ्रष्टाचारी संपत्ती आहे…हे भयंकर आहे.. आजच्या आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे.