मुंबई (वृत्तसंस्था) विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सर्व आमदारांना मुंबईत बोलावलं आहे. या आमदारांसोबत देवेंद्र फडणवीसांची मुंबईतील ताज प्रेसिडेंड हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत त्यांनी महाविकास आघाडीबाबत मोठं वक्तव्य केलं. महाविकास आघाडीचा पत्त्यांचा बंगला हा राज्यसभेच्या निवडणुकीत हलला होता. पण आता येत्या 20 तारखेला तो थेट कोसळेल, असा दावा फडणवीसांनी केला आहे.
भाजपा विधानपरीषद आमदारांच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांचं अभिनंदन केलं. त्याचप्रमाणे राज्यसभेला तुम्ही केलेल्या मेहनतीमुळे 10 तारखेला महाविकास आघाडीचा पत्त्यांचा बंगला हलला आता 10 तारखेला आपले पाचही उमेदवार निवडून आणल्यास महाविकास आघाडीचा पत्यांचा बंगला कोसळेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. काही भाजपा आमदार मुंबईत येणे बाकी आहे त्यांना लवकरात लवकर पोहचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. देवेंद्र फडणवीस उद्या सर्व आमदारांना दुपारी 4 वाजता मार्गदर्शन करतील.
















