नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात वृत्त माध्यमांना मोठं यश मिळालं आहे. माध्यमांना राजकीय नेत्यांना हाथरस घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट न घेऊ दिल्यामुळे देशासह राज्यात तीव्र पडसाद उमटत होते मात्र आज माध्यमांनाच्या मोहिमेनंतर आता पीडितेच्या गावात मीडियाला प्रवेश देण्यात आला आहे.
दरम्यान, गावात प्रवेश केल्यानंतर पीडितेच्या भावाने पत्रकारांशीबोलतांना म्हटलं आहे की, ‘डीएमने आम्हाला धमकी दिली आहे. आमचे फोन सर्विलांसवर आहेत. आम्हाला कुणाशी बोलण्यास बंदी घातली तसंच बाहेर देखील निघू दिलं नाही. तो पुढे म्हणाला,’पोलिसांनी आम्हाला सांगायला हवं होतं की, त्यांनी कुणाला जाळलं. कुणाच्या सांगण्यावरुन आमच्या मुलीला जाळलं. असं म्हणत पीडितेच्या कुटुंबीयांनी योगी सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहे. दरम्यान, हाथरसमधील सामूहिक अत्याचार प्रकरणानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. पीडितेला न्याय देण्याच्या मागणीसाठी देशभर आंदोलन केली जात आहेत.