जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु हे शुक्रवारी दि. 27 मे, 2022 व शनिवारी दि. 28 मे, 2022 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
शुक्रवार दि.27 मे, 2022 रोजी सकाळी 8.00 वाजता अमरावती येथून भुसावळ, जि.जळगावकडे प्रयाण, निलेशे बोरा यांच्या घरी सदिच्छा भेट (स्थळ- चौघुले प्लॉट, मुमराबाद नाका, मारोती मंदिराजवळ शनीपेठ, जळगाव), सकाळी 10.00 वा. भुसावळ येथे आगमन व राखीव, सकाळी 11.00 वा. मुख्याधिकारी, प्रांत, तहसिलदार, पोलीस प्रशासन यांच्यासोबत बैठक व शासकीय कार्यक्रम (स्थळ- प्रांत कार्यालय, भुसावळ), दुपारी 12.00 वा. अनिलभाऊ चौधरी यांच्या निवासस्थानी भेट व राखीव (स्थळ- न्यू एरिया वार्ड, तेली समाज मंगल कार्यालय, भुसावळ), दुपारी 1.00 वा. फिरोज शेख, प्रहार अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष, जळगाव यांच्या निवासस्थानी भेट (स्थळ- आशा हाईट, खडका रोड, भुसावळ), दुपारी 1.30 वा. संजय आवटे, प्रहार जिल्हा उपाध्यक्ष, जळगाव यांच्या निवासस्थानी भेट (स्थळ- गडकरी नगर, शंभूराजे मंडळ जवळ, भुसावळ), दुपारी 1.50 वा. विनोद कदम, प्रहार मागासवर्ग जिल्हाध्यक्ष, जळगाव यांच्या निवासस्थानी भेट (स्थळ- प्रल्हादनगर, रिंग रोड, भुसावळ), दुपारी 2.00 वा. दीपनगर वीजनिर्मिती केंद्र येथे कामगारांच्या समस्यांसदर्भात बैठक (स्थळ- दीपनगर, ता.भुसावळ), दुपारी 3.10 वा. साईबाबा मंदीर दर्शन व भुसावळ कडे प्रयाण (स्थळ-जामनेर रोड, श्रद्धा नगर, भुसावळ), दुपारी 3.30 वा. साईबाबा मंदिर ते अलॉयसिस स्कूल पर्यत बाईक रॅली व रोड शो (स्थळ – नाहाटा कॉलेज-दीनदयाळ नगर-आनंदनगर-साई डेयरी-भवानी पेठ-बाजार पेठ पोलीस स्टेशन-गांधी पुतळा-सेंट अलॉयसिस स्कूल), सायं. 5.00 अकलुद येथे कार्यकर्ता मेळावा व अपंगांना साहित्य वाटप कार्यक्रम (स्थळ-अकलूद), सायं. 5.30 वा. यावल शहरात आगमन व स्वागत समारंभ (स्थळ-बोरवाल गेट, यावल), सायं.5.45 वा. बोरवाल गेट ते सिनेमा टॉकीज रोड शो. (स्थळ- बोरवाल गेट, धनगर वाडा, मेन रोड, बारी चौक, सिनेमा टॉकीज), सायं. 6.30 वा. प्रहार जनशक्ती पक्ष कार्यकर्ता मेळावा व जाहिर सभा (स्थळ-सुदर्शन सिनेमा टॉकीज, यावल), सायं. 7.30 वा. यावल येथून फैजपूरकडे प्रयाण. रात्री 8.00 वा. फैजपूर शहर येथे आगमन व स्वागत समारंभ, रात्री 8.10 वा. फैजपूर येथून रावेरकडे प्रयाण, रात्री 9.00 वा. रावेर येथे आगमन व श्री. योगेश पाटील यांच्या निवासस्थानी भेट (स्थळ- शिक्षक कॉलनी, स्टेशन रोड, रावेर), रात्री 9.30 वा. श्री. राजेंद्र महाजन, जिल्हाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या विवाह सोहळ्यास सदिच्छा भेट (स्थळ- छत्रपती शिवाजी महाराज चौक, व्यायाम शाळा, रावेर), रात्री 10.30 वा. बुद्ध विहारात मुर्ती स्थापना व योगेश निकम, प्रहार युवक तालुकाध्यक्ष यांच्या घरी भेट (स्थळ- पिंप्री, ता. रावेर). शनिवार दि. 28 मे, 2022 रोजी सकाळी 7.00 वाजता मुक्ताईनगर येथून शासकीय वाहनाने खांडवी मार्गे जामोद, जि.जळगावकडे प्रयाण.