औरंगाबाद(वृत्तसंस्था) राज्यात मंत्री मंडळ स्थापन झाल्याच्या दिवशी आमदार संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त करून काढता पाय घेतला होता. यानंतर ‘कुटुंब प्रमुख’ म्हणून केलेल्या ट्विटनंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. परंतू शिरसाट यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असून माझ्या मोबाईलचा झालेला टेक्निकल प्राॅब्लेम आहे. मागची पोस्ट कशी पुन्हा फाॅरवर्ड झाली हे मला आता सांगता येणार नाही” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
शिरसाट म्हणाले, आम्ही सर्वजण वारंवार उद्धव ठाकरे यांना सांगत होतो की, तुम्ही पक्षप्रमुख म्हणून राहा, सत्ता दुसऱ्यांच्या हाती सोपवा. ठरल्याप्रमाणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते तर आज ही वेळ आली नसती. माझ्या मोबाईलमध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे ही पोस्ट झाली त्याचे मी या काळात तरी समर्थन करणार नाही. पुढे शिरसाट म्हणाले, आजही आम्ही शिवसेनाप्रमुख किंवा मातोश्रीच्या कुटुंबाबद्दल आदरभाव ठेवून आहोत. मंत्रिपद देताना आम्हाला नंदनवन येथे बोलवले होते. शेवटच्यावेळी यादी फायनल होते. एकनाथ शिंदे यांनी सर्वांशी चर्चा करून मंत्रिमंडळ स्थापन केले, त्यामुळे त्यांनी सर्वांचा विचार केला.