जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मा. अमीत राजसाहेब ठाकरे हे दि. २० व २१ जुलै असे दोन दिवसीय जळगांव जिल्हा दौऱ्यावर येत असुन जळगांव लोकसभा क्षेत्रात जळगांव शहर येथे व रावेर लोकसभा क्षेत्रात भुसावळ येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगांव जिल्हा निरीक्षक विनय भोईटे (मुंबई) यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
महासंपर्क अभियाना अंतर्गत नव्याने विद्यार्थी सेनेची बांधणी, नविन विद्यार्थी प्रवेश, नविन विद्यार्थी पदाधिकारी नियुक्ती व विद्यार्थ्यांशी संवाद असा दौऱ्याचा प्रमुख हेतु आहे. मा.अमीत ठाकरे यांच्या सोबत पक्षाचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे, विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे, राज्य उपाध्यक्ष अखिल चित्रे, सरचिटणीस सायली सोनवणे, स्विय सहाय्यक महेश ओवे यांची उपस्थिती असणार आहे.
दि. २० जुलै २०२३ रोजी सकाळी ९ ला धुळे येथुन रस्ता मार्गे जळगांवला प्रस्थान करणार असून पारोळा येथे ९.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जिल्हाध्यक्ष अनिल वाघ,उपजिल्हाध्यक्ष प्रज्वल पाटील व पदाकारी त्यांचे स्वागत करतील. तेथुन पुढे एरंडोल येथे १० वाजता एरंडोल तालुका अध्यक्ष विशाल सोनार व पदाधिकारी १० वाजता एरंडोल धरणगांव चौफुली जवळ स्वागत करतील.
१०.३० वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ द्वाराजवळ जळगांव ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे व ग्रामीणचे पदाधिकारी मा. अमीत ठाकरे यांचे स्वागत करतील.
११ वाजता जळगांव शहरात अमीत ठाकरे साहेब यांचे आगमन होणार असुन जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, महानगर अध्यक्ष किरण तळेले, विनोद शिंदे, उपमहानगर अध्यक्ष आशिष सपकाळे, जनहितचे उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम व शहरातील पदाधिकारी जल्लोषात स्वागत करतील. ११.३० वाजता एम.जे. कॉलेज येथे विद्यार्थी सेनेच्या शाखेचे उद्घाटन होणार असुन १२ ते दुपारी ३ पर्यंत हॉटेल रॉयल पॅलेस येथे महाविद्यालयीन युवक व युवती सोबत महासंपर्क बैठक होईल.
दुपारी ४ वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू यांची सदीच्छा भेट मा. अमीत ठाकरे घेणार आहेत. ५ वाजता जैन इरीगेशन येथे कृषी तंत्रज्ञान प्रकल्पाला भेट देतील.
दि. २१ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता अमीत ठाकरे भुसावळ येथे प्रस्थान करतील. सकाळी १० वाजता नाहाटा चौफुली येथे उपजिल्हाध्यक्ष विनोद पाठक व शहर अध्यक्ष राहुल सोनटक्के व पदाधिकारी स्वागत करतील.
११ वाजता नाहाटा कॉलेज !
येथे विद्यार्थी सेना शाखा उद्घाटन व ११.३० वाजता लोणारी मंगल कार्यालय येथे विद्यार्थी सेना महासंपर्क बैठक, लोणारी मंगल कार्यालय येथे होणार असून त्या ठिकाणी जनहितचे राज्य उपाध्यक्ष चेतन आढळकर, जिल्हा सचिव डॉ. विजयानंद कुळकर्णी, मुक्ताईनगर उपजिल्हाध्यक्ष राहुल काळे,चोपडा तालुका अध्यक्ष कल्पेश खैरनार,मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष मधुकर भोई, जामनेर तालुकाध्यक्ष अशोक पाटील स्वागत करतील.
दुपारी ३ वाजता जामनेर मार्गे संभाजीनगर येथे प्रस्थान !
दरम्यान मा. अमीत ठाकरे साहेब यांच्या दौऱ्यामध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी यांच्यामध्ये उत्साह संचारला असुन स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. मा. अमीत ठाकरे साहेब प्रथमच जळगांव जिल्हा दौऱ्यावर येत असुन बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे दौऱ्याला महत्व प्राप्त झाले असल्याची माहिती निरीक्षक विनय भोईटे, जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांनी दिली आहे.