जळगाव (प्रतिनिधी) विविध मागण्यांसाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे यांच्या नेतृत्वात आज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू यांना निवेदन देण्यात आले.
१) सन. २०२२-२३ च्या निकालातील झालेला गोंधळ तात्काळ थांबविण्यात यावा. २) ज्या विद्यार्थ्यांचे पेपर पुर्नचेक करणे (Redressor) झाले नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांचे दिनांक ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत पूर्ण करावे. ३) जे विद्यार्थी पेपर पुर्नचेक (Redressor) करण्यामध्ये उत्तीर्ण झालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांची फी त्यांना तात्काळ परत करण्यात यावी. ४) विद्यार्थ्यांना ४ विषयांची ऐटीकेटी (A. T.K.T.) देण्यात येऊन संबंधित विद्यार्थ्यांना पुढील वर्षांसाठी प्रवेश देण्यात यावा.
५) विद्यार्थ्याचे तक्रार निवारण सोडविण्यासाठी स्थापन केलेले Students Cells हे सातही दिवस कार्यालयीन वेळेमध्ये सुरु ठेवण्यात यावे व त्यामध्ये विद्यार्थ्यांचा एक प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात यावी. ६) गुन्हे शास्त्र तृतीय वर्षांचे. (LLB) थे विषयवाह्य असलेल्या प्रश्नांचे गुण विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात यावे. ७) तांत्रिक चुकांमुळे संगणकीय व मानवी चुकांमुळे विद्यार्थ्यांच्या निकाला मधील सर्व त्रुटी या तात्काळ दूर करण्यात याव्यात. (८) काही विद्यार्थ्याचे पेपर हे मानधन / डाळ-तास आधारावर (C.H.B.Lecturer) यांनी तपासले आहेत काय ? याची चौकशी करणेसाठी तात्काळ चौकशी समितीची नेमणूक करण्यात यावी. ९) आदर्श उत्तर पत्रिका (Model Answer Key) मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकां सोबत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ( University Website) तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावी. १०) विशेष करार सिध्दांत (Special Contract Theory) या पेपर मधील झालेला घोळ तात्काळ दुरुस्त करुन देण्यात यावा.
११) विद्यार्थ्यांचा निकाल जाहिर झालेनंतर पुरवणी परिक्षा ही तात्काळ घेण्यात यावी आणि त्याचा निकाल सुध्दा लागोलाग जाहिर करण्यात यावा. (मर्यादित कालावधी) तरी सन्माननीय महोदय साहेबांना सर्व विधी विभागाच्या विद्यार्थ्यांचे वतीने वरील संपूर्ण समस्या आपणांसमोर मांडण्यात आलेल्या आहेत. तरी त्यावर आपण तात्काळ विद्यार्थ्यांचे बाजूने सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा. विद्यार्थ्यांना न्याय न मिळाल्यास नाईलाजास्तव सर्व विद्यार्थी हे सनदशिल मार्गाने आपला लढा अधिक तीव्र स्वरुपात सुरु ठेवतील याची दखल आपण घ्यावी, व यामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य परिणामास सर्वस्वी विद्यापीठ जबाबदार असेल, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतांना जिल्हाध्यक्ष ऍड जमिल देशपांडे,चेतन अढळकर मनसे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, शहर सचिव महिंद्रा सपकाळे उपशहर अध्यक्ष ललित शर्मा जनहित व विधी विभाग किशोर खलसे,तालुका सचिव विधी विभाग व लॉ चे विद्यार्थी उपस्थित होते.