जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एका महाविद्यालय १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्थानकात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, दि. ११ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ७.३० ते दि. १३ मे २०२२ रोजी पावेतो वेळोवेळी १९ तरुणी सोबत अश्लील संवाद साधून उघडपणे लैगींक सुखाची मागणी केली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्थानकात देवेंद्र भागवत पाटील (वय २१, नायगांव ता. यावल), अजय मनोज माळी (वय २०, तळेगांव जामनेर), कमलेश भटू भामरे (वय १९ रा. सुराय ता. शिंदखेडा जिल्हा धुळे), अभिषेक रमेश बाविस्कर (वय १९, रा. फर्दापूर ता. सोयगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना अटक करण्यात आला आहे. तसेच पुढील पोहेकाँ सुनिल पाटील हे करीत आहेत.
















